उरणमध्ये विविध सामाजिक संस्थांतर्फे रक्तदान शिबीर संपन्न
सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆
टाटा हॉस्पिटल व खारघर ब्लड बँक यांच्या सहकार्याने कोकण ज्ञानपीठ, उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, लायन्स क्लब उरण, मी उरणकर सामाजीक व सांस्कृतीक संस्था उरण, माजी विद्यार्थी संघ, उरण महाविद्यालय,श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजीक संस्था उरण, वूमन ऑफ विसडम शैक्षणिक व सामाजिक संस्था उरण तसेच टायगर ग्रुप उरण यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण ज्ञानपीठ, उरण वाणिज्य व कला महाविद्यालय, तहसील कार्यालय समोर, उरण शहर येथे मंगळवार दि. 27/09/2022 रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले .दरवर्षी महाविद्यालयाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी रक्तदान शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. बळीराम गायकवाड, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विशाल पाटेकर,लायन्स क्लब उरणचे अध्यक्ष एमजेएफ लायन सदानंद गायकवाड़, वूमन ऑफ विसडम उरण या संस्थेचे अध्यक्ष सारिका पाटील,श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, टायगर ग्रुप उरणचे अध्यक्ष आकाश जोशी,कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय उरणचे सर्व प्राध्यापक वर्ग,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग , टाटा हॉस्पीटल व खारघर रक्तपेढीचे अधिकारी कर्मचारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते सुनील वर्तक, आदर्श शिक्षक संजय होळकर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Be First to Comment