Press "Enter" to skip to content

दुचाकींचे प्रचंड नुकसान

रोहा कोलाड रस्त्यावर दोन दुचाकी स्वारांची समोरासमोर धडक : तीघे गंभीर जखमी

सिटी बेल ∆ धाटाव ∆ शशिकांत मोरे ∆

रोहा कोलाड रस्त्यावर पंचरत्न अपार्टमेंट समोर रात्री भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन दुचाकी स्वारांची समोरासमोर जोरदार धडक बसली.दरम्यान झालेल्या धडकेत तिघे जण गंभीररीत्या जखमी आहेत.मात्र या धडकेत दोन्ही दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

रोहा पोलसांकडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार,२६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी एक्सेल बाजूकडून ऋतिक गणेश पाटील(२२) आपला सहकारी अंकुर अनिल भोई हिरो रा.पडम हे होंडा कंपनीची स्पल्लेंडर क्र.एम एच ०६ पी.९९४५ घेऊन रोह्याकडे जात असताना रोहा बाजूकडून धाटावकडे येणाऱ्या यामाहा कंपनीची एफ.झेड. क्र. एम एच ०६ सी ए.०४६४ च्या अनिकेत गोविंद खामकर रा.घोसाळे हे चुकीच्या साइडला येऊन फिर्यादीच्या दुचाकीला जोरात धडक दिली.यात दोन्ही दुचाकी स्वारांची समोरासमोर जोरदार धडक बसल्याने मोठे नुकसान झाले आहे.

या तीघांना डॉ.भट हॉस्पिटल व डॉ जाधव यांच्या इस्पितळात प्राथमिक उपचारांसाठी आणले.यांच्यावर अधिक उपचार करण्यात आले.मात्र तिघेही जखमी असल्याचे सांगण्यात आले.या घटनेबाबत वृतिक् पाटील यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून रोहा पोलीस ठाण्यात मोटर अपघात रजी.०७/२०२२ अन्वये नोंद करण्यात आली आहे तर रोह्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.शिरसाठ यासह सहकारी अधिक तपास करीत आहेत.

मात्र रोहा कोलाड रस्त्यावर दिवस रात्री धूम स्टाईलने दुचाकी चालविणाऱ्या या धूम स्टाईल बाजांना आवर घालणार कोण? हाच प्रश्न समोर आला असून अशा बेदरकार पणे वाहन चालविणाऱ्यामुळे पादचाऱ्यांची सुरक्षा सुद्धा धोक्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.