पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त नागोठण्यातील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवडा अंतर्गत रायगड जिल्ह्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपा रोहा तालुका मंडळाच्या वतीने आणि नागोठणे जिल्हा परिषद गटाकडून येथील डाॅ. कुंटे यांच्या दवाखान्यात सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरास रक्त दात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नवी मुंबई येथील डी. वाय.पाटील हाॅस्पीटल मधील रक्त पेढीच्या सहकर्याने संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिरात सुमारे ६४ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्वांना रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र व आकर्षक भेट वस्तू देण्यात आली.
या रक्तदान शिबिरासाठी भाजपाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांतदादा ठाकूर यांनी यांच्यासह दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील आदींनी सदिच्छा भेट दिली.
आ. प्रशांतदादा ठाकूर यांनी शिबिराच्या आयोजना बद्दल भाजपाचे उपस्थित जिल्हा, तालुका, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे, रोहा तालुका अध्यक्ष सोपानभाऊ जांबेकर, तालुका सरचिटणीस आनंदभाऊ लाड, माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे, नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी, शहर अध्यक्षा शीतल नांगरे, सोशल मिडिया संयोजिका प्रियांका पिंपळे, नागोठणे गट अध्यक्ष ज्ञानेश्वर शिर्के, विवेक रावकर, तिरतराव पोलसानी, सिराजभाई पानसरे, सुभाष पाटील, अशोक अहिरे, प्रमोद गोळे, विठोबा माळी, मारुती शिर्के, शेखर गोळे, संतोष लाड, गौतम जैन, मोरेश्वर म्हात्रे, अपर्णा सुटे, निलिमा राजे, मुग्धा गडकरी, सोनी पांडे, ज्योती लाड आदींसह पदाधिकारी व विभागातील कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
या रक्तदान शिबिरासाठी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील रक्तपेढीच्या प्रशासक तथा वरिष्ठ वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या प्राची नायर, डॉ. सुमेधा शिंदे, डॉ. मेलवीन, टेक्निकल विभागाचे राजेश पाटील, स्टाफ नर्स सुचीता अग्रवाल, टेक्निशियन निलेश खानोलकर, कुसूम गुप्ता, हासिम शेख, आफ्रिन पटेल, मोजरा खान, साहील डिओटे व आरती भोंग आदींचे सहकार्य मिळाले.
Be First to Comment