सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देवून घडवित असतात.यामुळे हेच विद्यार्थी शिक्षणांच्या माध्यमातून अकाशाला गवसणी घालत असतात.आज ग्रामीण भागातील असलेल्या शाळा दुर्गम भागात असल्यामुळे काही ठिकाणी पोहचण्यासाठी शिक्षकांना खूप मेहनत घ्यावी लागते.मात्र आपले काम निष्ठापुर्वक करीत विद्यार्थ्यांना घडवित असल्यामुळे युनिटी वेल्फर क्लब कर्जत यांच्या माध्यमातून राजिप शाळा निंबारवाडी येथिल शिक्षक संदीप सदाशिव काईनकर आदर्श शिक्षक पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले.
यावेळी ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव खुर्द सरपंच प्रितेशजी मोरे , वावर्ले केंद्रप्रमुख निशा देशमुख, राजमाता जिजाऊ विद्यामंदिर बोरगाव खुर्द मुख्याध्यापक शेळके सर, ग्रामसेवक के. पी.पाटील, वावर्ले केंद्रातील सर्व शिक्षक वृंदशिक्षण तसेच त्यांचे मित्र मंडळी उपस्थित यांनी त्यांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थी हीच आपल्या देशाची खरी संपत्ती हाच उदिष्टे डोळ्यांसमोर ठेवून शिक्षक आपले काम करीत असतात. त्यांस बरोबर काईनकर यांना रायगड जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यांचे समजते.त्यांचे शिक्षक मित्र भिकु नामदेव पाटेकर, शाळा वावर्ले ठाकूरवाडी यांना सुद्धा वेल्फर क्लब कर्जत यांच्या माध्यमातून हा पुरस्कारप्राप्त झाल्यामुळे त्यांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.








Be First to Comment