सहयाद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप
सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
नुकताच पार पडलेल्या गणेशोत्सवात सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून सहयाद्री विदयार्थी अकादमीने नागरीकांना आवाहन केले होते की बाप्पाच्या दर्शनासाठी येताना प्रसादा ऐवजी शाळेय साहित्य आणावे या आवाहनाला अनुसरून गणेशभक्तांनी आणलेल्या शालेय साहित्यांचे आज सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र उपाध्यक्ष समीर म्हात्रे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी पेण तालुकाध्यक्ष केतन म्हात्रे, उपाध्यक्ष रोहित केणी, माजी तालुकाध्यक्ष रोशन टेमघरे, साईराज कदम, स्वप्नील म्हात्रे, विनोद म्हात्रे, नितीन म्हात्रे ,आराव शाळेचे मुख्याध्यापक चोरमारे, निंबारवाडी संजय कंक, पाचगणी कल्पना राऊत, वेताळपट्टी सुजाता पाटील आदींसह प्रतिष्ठानचे मावळे उपस्थित होते.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष समीर म्हात्रे यांनी सांगितले की मागच्या अनेक वर्षांपसून ही संस्था वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत आहे.त्यामुळे यावेळचा उद्देश वेगळा ठेवून ज्या गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना काही करावे वाटते अशांना शिक्षणापासून वंचित राहवे लागत असल्याने शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांचे भवितव्य घडणार असल्याने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.येणा-या काळात याही पेक्षा विद्यार्थ्यांना भरीव मदत करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.
सहयाद्री प्रतिष्ठानच्या वतीने आज पेण तालुक्यातील अराव, निंबारवाडी, शेडाशी, पाचगणी आणि वेताळपट्टी या पाच शाळेतील जवळपास दीडशे विद्यार्थ्यांना वही, पेन्सिल,पेन, शॉपनर, खोड रबर आदी शालेय साहित्यांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.








Be First to Comment