सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) #
उरण परिसरातील असलेल्या कंपन्यांमुळे कोरोना पॉजेटीव्हचा आकडा वाढताना दिसत आहे. कंपनी प्रशासनाने याबाबत ठोस उपाययोजना करून खबरदारी घेतली नाहीतर पॉजेटीव्हचा आकडा मोठ्या संख्येने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेली दोन तीन दिवस पॉजेटीव्हमध्ये कंपनी कामगारांची संख्या जास्त असते. आज सुद्धा आलेल्या पॉजेटीव्ह आकड्यामध्ये कंपनी कामगारांची संख्या जास्त असल्याचे समजते. आज उरणमध्ये एकूण १४ पॉजेटीव्ही सापडले आहेत. तसेच आणखीन एकाचा मृत्यू होऊन हा आकडा ८ वर गेला आहे. उरणमध्ये आज उरण २, मोरा २, जसखार ३, सोनारी ३, बोकडविरा १, पागोटे १, नागाव १, पाणजे १ असे एकूण १४ पॉजेटीव्ह सापडले तर नवीन शेवा१, पागोटे १, गोवठणे १, चिरनेर १, हनुमान कोळीवाडा १ असे एकूण ५ जणांना घरी सोडण्यात आले तर आज आणखीन एकाचा कोरोनाने मृत्यू होऊन हा आकडा ८ वर गेला आहे. आज एकूण पॉजेटीव्हचा आकडा ३६८ तर बरे झालेले २४७, उपचार घेणारे ११४ तर मयत ८ अशी आकडेवारी असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. उरणमध्ये कोरोना पॉजेटीव्ह बरोबरच मयतांचा आकडाही वाढू लागला आहे. या परिसरातील कंपनीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रशासनाने कंपनी विरोधात ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा उरणमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Be First to Comment