सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆
डॉ .सुहास हळदीपूरक यांच्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आणि श्रीराम सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ चिरनेर (उरण) यांच्या सार्वजनिक गौरागणेश उत्सवा निमित्त नेत्र चिकीत्सा शिबीराचे आयोजन चिरनेर येथील श्रीराम मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते.या शिबीरात २२५ चिरनेर व परिसरातील नेत्ररूग्णांची तपासणी करून काही नेत्ररूग्णांना अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले .
या शिबिरात ७७ नेत्ररूग्णांचे मोतिबिंदू ऑपरेशन करण्यात येणार आहे. त्यातील पिवळे रेशन कार्ड धारकांना मोफत व केशरी रेशनकार्ड धारकांना लेन्स अल्प दरात उपलब्ध करून शस्रक्रिया करण्यात येणार आहे. याकामी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे विनोद पाचघरे व श्रीराम सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ चिरनेर या मंडळाचे पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले . विविध मान्यवरांनी व पंचायत समिती माजी सभापती भास्कर मोकल यांनी या मंडळाचे विशेष कौतुक केले आहे.
नेत्ररूग्णांच्या पनवेल येथे शस्रक्रियेसाठी जाण्यासाठी प्रवास व्यवस्था पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर मोकल हे करणार आहेत.
Be First to Comment