Press "Enter" to skip to content

माथेरान मध्ये चार दिवसांपासून संततधार पाऊस

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान मध्ये चार दिवस संतधार पाऊस पडत आहे,
गुरवारी सकाळ पासून सुरू असलेल्या पावसाने अजूनही उसंत घेतली नसून रविवार सकाळ पर्यंत 507 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

माथेरान मध्ये अती पडल्याला पावसामुळे जुम्मापटटी दरम्यान घाटात रस्त्यावर माती वाहून आली तर जमिनीची धूप झाल्या मुळे एक झाड रस्त्यावर पङले पण त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला नसून छोटे झाड जेसीबी च्या सहाय्याने बाजूला करून थोङा वेळ थांबलेली वाहतूक काही वेळातच पूर्वपदावर करण्यात आली, सप्टेंबर महिन्यात उन पावसाचा खेळ सुरू असतो तर इंद्रधनुष्याचही दर्शन या वेळेत नागरिकांना होते पण यंदा सप्टेंबर मध्ये पडत असलेल्या पावसाने जुलै महिन्याची आठवण करून दिली आहे.

गेल्या दोन वर्षां पुर्वी एमएमआरडीए च्या माध्यमातून चांगले रस्ते कार्यकारी अभियंता अरविंद धाबे यांच्या देखरेखे खाली करण्यास आले पण यंदा माथेरानला ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने माथेरान मधील काळोखी परिसरात अती पाण्याच्या लोंढयाने पेव्हर ब्लॉक निघालाने त्यांचा फटका एमएमआरडीए ला बसला परंतू रस्त्याचे झालेले नुकसान ठेकेदाने लगेचच दुरुस्त करून पूर्ववत करून दिले आहेत.

या पावसात जरी कोणतीही दुर्घटना झाली नसली तरी मुस्लिम मोहल्ल्यात काही घरात पाणी गेल्याने नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत,अती पावसाने घाटातला रस्त्यावर देखील छोटे मोठे खड्डे पङले आहेत.
तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने माथेरान घाटातिल धबधबे पुनर्जीवित झाले असून सप्टेंबर महिन्यात पर्यटक जुलैचा आनंद घेतांना दिसत आहेत, साधारण सप्टेंबर महिन्यात पावासाळी पर्यटन हंगाम संपत येतो परंतू या पावसामुळे अजूनही पर्यटक माथेरानकडे आकर्षित होतांना दिसत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.