मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी
भालचंद्र म्हात्रे ला २० वर्षाची कारावासाची शिक्षा व ५० हजारांचा दंड
सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆
रायगड जिल्ह्यातील पोयनाड विभागातील वीस वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी भालचंद्र शंकर म्हात्रे यास वीस वर्षाची कारावासाची शिक्षा व रु. ५०,०००/- रकमेचा दंड न्यायाधीश-३ श्री. एन. के. मणेर यांनी महत्वपुर्ण निकाल दिला. सदर खटल्यात शासकीय अभियोक्ता भुषण साळवी यांनी सरकारपक्षातर्फे न्यायालयसमोर केलेला युक्तिवाद महत्वपूर्ण ठरला.
थोडक्यात हकिकत अशी की, सदरचा गुन्हा हा जानेवारी २०१७ दरम्यान रायगडजिल्ह्यातील पोयनाड विभागात घडला आहे या प्रकरणातील आरोपी भालचंद्र शंकर म्हात्रे याने या प्रकरणातील दिव्यांग पिडीता मुलगी ही घरकाम करीत असताना ती मतिमंद आहे हे आरोपीत यास माहीत असतानाही तिचे मतिमंदपणाचा गैरफायदा घेवून तिला स्वतःचे घराचे माळयावर नेवून, तिचेवर वारंवार जबरदस्तीने संभोग करून तीला गरोदर ठेवली व सैनिक अत्याचार केले. या प्रकरणात मुलीचे वय २० वर्षाचे आहे व ती मतिमंद आहे हे माहित असून सुध्दा तिच्यावर आरोपीने लैंगिक अत्याचार केले हे मा. न्यायालयासमोर सिध्द झाले आहे.
त्यानुसार न्यायालयाने आरोपी भालचंद्र शंकर म्हात्रे यास भा. द. वि. ३७६ (n), ३२३, ३४ या कलमांतर्गत प्रमाणे दोषी पकडून, भा. द. वि. कलम ३७६ (n), ३२३ प्रमाणे २० वर्षाची शिक्षा व रक्कम रुपये ५०,०००/ दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील फिर्यादी यांनी याप्रकरणातील आरोपी भालचंद्र शंकर म्हात्रे याने आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे लक्षात येताच पोयनाड पोलीस स्टेशनला तकार नोंदविली असता, हया प्रकरणी सदर केसचा पोयनाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. एल. शेवाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जलदगतीने तपास पूर्ण करून मोलाचे सहकार्य केले.
सदर खटल्यात शासकीय अभियोक्ता” भुषण साळवी यांनी एकूण १३ साक्षीदार तपासून दमदार युक्तिवाद केला, त्यामध्ये फिर्यादी, स्वतः पिडीता, डॉ. बी. वाय वायंगणकर, साक्षीदार नैनिता लक्ष्मण पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. एल. शेवाळे यांची साक्ष न्यायालयात महत्वपूर्ण ठरली. तसेच पैरवी कर्मचारी पोलीस हवालदार सचिन खैरनार, पोलीस हवालदार राजेश नाईक,, महिला पोलीस शिपाई ए.एच.म्हात्रे पोलीस शिपाई पाटील यांचे सहकार्य मोलाचे ठरले.

Be First to Comment