बनावट आधारकार्ड व्दारे ॲमेझॉन व फ्लिपकार्ट कंपनीस गंडा घालणाऱ्या उच्चशिक्षीत इंजिनिअर व त्याचे साथीदारांना अटक
सिटी बेल ∆ मानपाडा ∆ संजय कदम ∆
मानपाडा पोलीस ठाणेकडुन बनावट आधारकार्डव्दारे अमेझॉन व फ्लीपकार्ट कंपनीस गंडा घालून त्यांची फसवणुक करणाऱ्या उच्च शिक्षीत इंजिनिअर व त्याचे साथीदारांचे टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
आरोपी यांनी गुगलवरुन ओळख नसलेल्या लोकांचे आधारकार्ड डाऊनलोड करुन, त्या आधारकार्ड वरील मुळ इसमाचा फोटो एडीटर अँपवरुन क्रॉप करुन त्या ठिकाणी आरोपी हे त्यांचा फोटो लावुन, सिमकार्ड विक्रेता आरोपी याचेकडुन सदर आधारकार्डचे आधारे सिमकार्ड खरेदी करायचे, सिमकार्डचे मोबाईल नंबरवरुन ॲमेझॉन व फ्लीपकार्ट या कंपन्यांकडुन ऑनलाईन मोबाईल, टॅब, आयपॅड, लॅपटॉप अशा वस्तु ऑर्डर करायचे. कंपनीचा डिलेव्हरी बॉय सदर वस्तु देण्यास आल्यावर त्याचेकडुन सदर वस्तुचा बॉक्स ताब्यात घेवुन त्यास पैसे मोजण्यात गुंतवुन ठेवुन, तो पैसे मोजत असताना सदरचा वस्तुचे पॅकींग बॉक्स त्यांचे साथीदार ताब्यात घेवुन त्या बॉक्सला कटरने कापुन त्यातील वस्तु काढुन घेवुन त्या ठिकाणी त्या वजनाचा दगड, कपड़ा पॅक करून पैसे कमी असल्याचे कारणावरुन नंतर पैसे देतो असे कारण सांगुन सदर वस्तुचा बॉक्स डिलेव्हरी बॉयला परत करुन तो कंपनीस परत पाठविणेस सांगुन, डिलेव्हरी बॉयकडुन प्राप्त मोबाईल व इतर वस्तु कमी किमतीत बाजारात विक्री करीत असल्याचे आढळुन आले आहे.
आरोपी यांनी गुजरात, कलकत्ता राज्यातील विविध शहरात तसेच महाराष्ट्र राज्यातील पुणे, मुंबई, सातारा, ठाणे, अलिबाग शहरात सदरचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यांना यापुर्वी कराड, अलिबाग, कासारवडवली या पोलीस ठाणेत अशा प्रकारचे गुन्हे केल्याबद्दल अटक करण्यात आली असल्याची माहिती तपासात प्राप्त झाली आहे. तरी आरोपीत हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर इतरही ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत काय याचा तपास करण्यात येत आहे.
नमुद गुन्हयाचा तपास वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली चालु करण्यात आला. तपासात केलेल्या अथक प्रयत्नात आरोपीत नामे रॉबीन अॅन्टनी आरुजा (वय २८ वर्षे, रा. फ्लॅट नं. ७०५, रिव्हर व्ह. एफ विंग, कासारियो, पलावा, डोंबिवली पूर्व), किरण अमृत बनसोडे (वय २६ वर्षे, रा. १०३, स्वप्नसुंदर रेसिडेंन्सी, गणेश चौक, काकाच्या ढाब्या जवळ, कल्याण पुर्व), रॉकी दिनेशकुमार कर्ण (वय २२ वर्षे, रा. रुम नं. बी / १०५, उपासना अपार्टमेंट, राजाराम पाटील नगर, आडवली-ढोकळी, पिसवली, कल्याण पुर्व), नवीनसिंग राजकुमार सिंग (वय २२ वर्षे, रा. फ्लॅट नं. १०९, सदगुरु प्लाझा, काकाचा ढाबा जवळ, मलंग रोड, पिसवली, कल्याण पुर्व) तसेच अलोक गुल्लु यादव (वय २० वर्षे, रा. रुम नं. १० जय माता दी चाळ, नॅशनल स्कुल जवळ, दिवा शिळ रोड, डोंबिवली पूर्व ( सिमकार्ड विक्रेता) यांना अटक करण्यात आलेली आहे.
आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी ॲमेझॉन व फ्लिपकार्ट या कंपन्यांकडुन बनावट आधारकार्डचे आधारे सिमकार्ड प्राप्त करुन त्यांचेकडुन मोबाईल व इतर वस्तु ऑर्डर करुन त्या वस्तुंचे बॉक्स प्राप्त झाल्यानंतर ते कटरचे सहाय्याने कापुन त्यातील वस्तु काढुन त्या ऐवजी दगड व कापड टाकुन, सदर वस्तु पैसे कमी असल्याचा बहाणा करुन परत कंपनीस पाठवुन देवुन, स्वतःकडे ठवेलेल्या वस्तु बाजारात कमी किमतीत विक्री करीत असल्याची कबुली दिलेली आहे.
सदर गुन्हयात एकंदर ५,८५,१३६ / – रु किमतीचे २२ मोबाईल फोन, ०१ लॅपटॉप, ०१ आयपॅड, ०१ टॅब तसेच २० सिमकार्ड, २९ बनावट आधारकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यातील आरोपीत रॉबीन अॅन्टनी आरुजा हा एमटेक इंजिनिअर आहे. तसेच आरोपी रॉकी दिनेशकुमार कर्ण हा कॉलसेंटरमध्ये नोकरी करीत आहे. आरोपी अलोक गुल्लु यादव हा सिमकार्ड विक्रेता असून, त्याचेकडुन आरोपीत हे जास्त पैसे देवुन ग्राहकाची कोणतीही खात्री न करता सिमकार्ड खरेदी करून, त्याआधारे ऑनलाईन वस्तु ऑर्डर करुन, प्रापत वस्तु बाजारात स्वस्त दरात विक्री करुन मिळालेल्या पैशातुन मौजेमजा करीत असायचे.
सदरची कामगिरी कल्याण पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, कल्याण परीमंडळ ३ पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांचे मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वपोनि शेखर बागडे, सपोनिरी. सुनिल तारमळे, पोहवा प्रशांत वानखेडे, पोहवा अशोक कोकोडे, पोहवा सुशांत तांबे, पोशि संतोष वायकर, पोशि तारांचंद सोनवने यांचे पथकाने केलेली आहे.
Be First to Comment