सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय फुंडे येथील हिंदी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. झेलम झेंडे यांना यावर्षीचा शीला देवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार संस्थेच्या अध्यक्ष शीला देवी आपरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सदर कार्यक्रम जालना येथे संपन्न झाला.सदर कार्यक्रमावेळी संस्थेचे सचिव रमाकांत आपरे यांनी या संस्थेची स्थापना का केली व हे पुरस्कार देण्यामागचे कारण सांगितले तसेच डॉ झेंडे यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल अभिनंदन केले.डॉ.झेलम झेंडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने शिक्षक वर्ग, कर्मचारी वृंद, पालक वर्ग, विद्यार्थी, मित्र परिवार नातेवाईकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.








Be First to Comment