Press "Enter" to skip to content

“एक हाथ मदतीचा” या संकल्पनेतून चिमुकलीला मिळाला मोठा आधार

पित्याच्या अकस्मात मृत्यूने पोरक्या झालेल्या मुलीला दानशुरांनी केली अडीच लाखाची मदत

सिटी बेल ∆ केळवणे ∆ अजय शिवकर ∆

जो आवड़तो सर्वाना तोचीं आवडे देवाला.. केळवणे गावातील स्वर्गीय तुषार भगवान पाटिल याचे अपघाती निधन झाले…. एका लेकीसाठी बाबा म्हणजे तिचा सर्व काही असतो..आणि एका बापासाठी त्याची मुलगी म्हणजे त्याचं सर्व काही असते.. आपल्या लेकीसाठी खुप सारी स्वप्न उराशी बाळगुन तो जगत होता..तिला मोठ करावं तिच्या पायावर तिने उभ रहावं..हे प्रत्येक बापाचं स्वप्न असतं..आज त्या चिमुकलीला बाबा आपल्याला सोडून कुठे गेला असेल हे कळतही नसेल..अगदी कोवळ्या वयात तिचा बाबा तिच्यापासून दुरावला..

त्या चिमुकली साठी जशी जमेल तशी आपापल्यापरीने केळवणे गावातील तसेच आजुबाजुच्या गावातील दानशूर व्यक्ति क़डून दोन लाख पन्नास हजार रूपये ही रक्कम सुशील हिराज़ी ठाकुर, महेंद्र बुधाज़ी पाटिल आणि सचिन हिराज़ी ठाकुर यांच्या सहकार्याने जमा झाली असुन त्या रक्कमेची स्वर्गीय तुषार भगवान पाटील यांच्या मुलीच्या नावावर तिच्या वयाची १८ वर्ष पूर्ण होई पर्यंत LIC पॉलिसी काढली आहे. ज़ेणे करुन तिला तिच्या आयुष्यात पुढच्या वाटचालीसाठी तिला मदत होईल.

अल्प वयात निराधार झालेल्या चिमूकलीला मोठी मदत केल्याबद्दल सर्व दानशुर व्यक्तींचे सर्व स्तरातून कौतुक केले जातेय.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.