Press "Enter" to skip to content

वाहन चालकास चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या प्रवाशाला अटक

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆

नवीमुंबई व रायगड जिह्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीस प्रवासी म्हणून वहानात बसून प्रवास करीत असताना अचानक काही बहाणा करून वाहन थांबवून वाहन चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याची कार, रक्कम जबरीने लुटण्याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष २ पनवेल ने आरोपीस जेरबंद केले आहे .

पनवेल जवळील मॅक्डोनाल्ड, कलंबोली समोर पुणे येथे जायचे असे सांगून ०४ इसम खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या आर्टिका कार क्र. MH 08-AN 9576 मध्ये बसले. सदर कार मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून पुण्याच्या दिशेने जात असताना भातण बोगद्याच्या जवळ आले. त्या ४ इसमापैकी एकाने बाथरूम ला जाण्याचा बहाणा करून कार बाजूला घेण्यास सांगितले. त्याचवेळी त्याच्या सोबतच्या ३ जणांनी ड्रायव्हरला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून रोख रक्कम व कार जबरीने घेऊन गेले.

याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद होताच सहाय्यक पोलीस आयुक्त सो (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा समांतर तपास कक्ष २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तपास करीत असताना सदर गुन्ह्यातील आरोपींच्या येण्या जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पाहून तांत्रिक तपास करीत असताना पोउपनि. मानसिंग पाटील यांना एक इसम चोरीची एर्तीगा कार विक्री करण्यासाठी टेम्बोडे ब्रीज जवळील परिसरात येणार असल्याची बातमी गोपनीय बातमीदारकरवी प्राप्त झाली होती.

त्याप्रमाणे टेंबोडे ब्रिजच्या आसपास सापळा रचून आरोपी नामे महेंद्रप्रताप उर्फ अंकीत ग्यानेंद्र सिंग, वय 30 वर्षे, रा. कलंबोली मूळ गाव – प्रतापगड, राज्य उत्तर प्रदेश याला ताब्यात घेऊन त्याच्या अंगझडतीमध्ये नंबर प्लेट नसलेली एर्टिगा कार मिळून आल्याने सदर कारबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता ती कलंबोली पोलीस ठाणे गुन्हा क्र.१७१/२०२२ भा द वि कलम ३९२,३४ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे सदर आरोपीकडे आणखी तपास केला असता,त्यांनी देखील साथीदारांसह हिरानंदानी ब्रिज, खारघर येथून एका खाजगी प्रवासी घेऊन जाणाऱ्या एर्टिगा कारला थांबवून वाकडला जायचे आहे असे सांगून कार मध्ये बसून खालापूर टोल नाकाच्या अलीकडे त्यांच्यापैकी एकाने उलटी येत असल्याचा बहाणा करून कार थांबवून ड्रायव्हरला चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम घेतले असल्याचे सांगितले.

सदर बाबतीत खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता . सदरचे आरोपी हायवे रॉबरी सारख्या गुन्ह्यात सराईत असून त्यांच्यावर ठाणे शहर, एन आर आय पोलीस ठाणे येथे यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.अटक आरोपीकडून कलंबोली पोलीस ठाणेकडील गुन्ह्यातील एकुण १०,००,००० रुपये किंमतीची एर्तीगा कार जप्त करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.