सिटी बेल ∆ खोपटे उरण ∆ अजय शिवकर ∆
खोपटे गावाच्या रस्त्यावर अमेया कंपनी शेजारी दुपारी दीड वाजता MH 46-S -8585 नंबर चा डंपर भराव कामात कार्यरत होता,त्यावेळी डंफर चालकाच्या दुर्लक्षतेमुळे वीज प्रवाहित तार तुटून डंफरला गुंडाळून रस्त्यावर मधोमध अडकून वाहनांची कोंडी केली त्यामुळे खोपटे हायवेवर खूप प्रमाणात ट्राॕफिक जाम झाली.
विजेची तार तुटल्याने लोकांत खूपच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यात चतुर्थीचे गणपती असल्याने जास्तच वाहतूक होती. वीज खंडित करून रस्ता मोकळा करे पर्यत दोन तासांच्या कालावधीत प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागला.








Be First to Comment