सिटी बेल लाइव्ह / पाली /बेणसे.(धम्मशिल सावंत) #
कोकणवासीयांसह समस्त गणेशभक्तांचा लोकप्रिय सण असलेल्या गणेशोत्सवावर यावर्षी कोरोनाचे संकट ओढवले आहे. तरी देखील गणेश मूर्ती कारखान्यात मूर्तींचे निर्माण केले आहे. भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बाप्पाच्या उत्सवावर कोरोनाचे संकट पसरले आहे. त्यातच निसर्ग चक्रीवादळाने मोठे नुकसान केले आहे.अशा प्रतिकूल परिस्थिवतीत हार न मानता नव्या जोमाने कामाला लागून पेण शहरातील दीपक कला केंद्रामधून 1200 गणेशमूर्ती दुबई,थायलंड,इंडोनेशिया व मॉरिशस येथे पाठविण्यात आल्या आहेत अशी माहिती दीपक समेळ यांनी दिली.
मुंबई,पुणे,कल्याण,डोंबिवली येथे गणेशमूर्ती विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात स्टॉल उभारून विक्री केली जाते,पण यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शहरात सदरचे स्टॉल उभारण्यात येतील की नाही अशीही शंका निर्माण झाली आहे. पेणच्या गणेशमूर्ती अत्यंत रेखीव, सुरेख, आकर्षक डोळे, व सुंदर असल्याने येथील मूर्तींना मोठी मागणी असते.
दरवषी पेण तालुक्यातुन लंडन,ऑस्ट्रेलिया, थिवी, अमेरिका,दुबई थायलंड,इंडोनेशिया व मॉरिशससह अनेक देशात बाप्पाची वारी होते.पेण तालुक्यातुन दरवर्षी एक लाख गणेशमूर्ती परदेशात पाठविल्या जातात पण यावर्षी फक्त 25 हजार बाप्पांची वारी फॉरेनला होणार आहे.
Be First to Comment