एक्सल इंडस्ट्रीज कंपनीत केमीकलयुक्त रसायन हाताळताना लागलेल्या आगीत तीन कामगार भाजले
कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
सिटी बेल ∆ रोहा ∆ समीर बामुगडे ∆
धाटाव औद्योगिक क्षेत्रातील एक्सल इंडस्ट्रीज कंपनीत केमीकलयुक्त रसायन हाताळताना लागलेल्या आगीत तीन कामगार भाजल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
एक्सल कंपनीत याअगोदर जलवायु प्रदूषणासह ,अपघात होने, आग लागणे, असे प्रकार वरांवार घडले आहेत. भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी एक्सल कंपनीत घडलेल्या अपघाताबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी अपघातग्रस्त कामगारांना त्यांच्या परिवाराला योग्य न्याय देण्याची मागणी केली आहे. कंपनीत जखमी झालेले कामगार कंत्राटी कामगार म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यास भाजपच्या वतीने कंपनीसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अमित घाग यांनी दिला आहे. कंपनीने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला , उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाला कंपनीने त्वरित कळवणे क्रमपात्र असताना त्यांनी दुर्लक्ष केले .अमित घाग यांनी तक्रार करताच उपसंचालक केशव केंद्रे यांनी कंपनीत येऊन घटनास्थळाला भेट दिली.वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत कंपनीवर कारवाई करण्याची मागणी अमीत घाग यांनी केली आहे.
शनिवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता एक्सल कंपनीत पी टू एस 5 प्लांट मध्ये फॉस्फरस पेंटासल्पाइड हे केमीकल हातलत असताना कंत्राटी कामगार रामचंद्र उमाजी ढमाल वय वर्ष 33 रा. सांगडे, ता. रोहा तसेच हरेश तळकर वय वर्ष 26 आणि कंपनीचे अधिकारी हे अपघातात किरकोळ भाजले आहेत.
हरेश व रामचंद्र हे कामगार जास्त भाजल्याने त्यांना येरोली येथील नॅशनल बर्न हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग रायगड यांनी दखल घेतली असून अधिकारी केशव केंद्रे यांनी रविवारी कंपनीमध्ये जाऊन घटनेची चौकशी केली आहे, कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक्सल कंपनीवर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Be First to Comment