सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
युनायटेड वे मुंबई जल संजीवनी कर्जत प्रकल्प आणि कोवेस्ट्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हवामान बदलामुळे शेतीवर होणाऱ्या दुष्परिणामांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामोरे जाऊन शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावणे आहे. शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन पद्धतीची माहिती मिळावी, उन्हाळ्यात पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा जेणेकरून अतिरिक्त पिके घेता येईल, जमिनीची होणारी धूप टाळावी, पिकांचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे इच्छुक शेतकऱ्यांना कोवेस्ट्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी च्या सामाजिक बांधिलकी अंतर्गत तुषार सिंचन संच वाटप करण्यात येणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन युनायटेड वे मुंबईचे मुकेश देव (प्रकल्प व्यवस्थापक-सामाजिक प्रभाव) यांनी केले.
या प्रसंगी कोवेस्ट्रो सी.एस.आर.टीम च्या प्रतिनिधी कविता, पुनीत आणि गार्गी यांनी विविध शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या समस्या प्रकर्षाने समजून घेतल्या.
सदर सभेस खांडस, बलीवरे, आंभेरपाडा, बेलाचीवाडी, नांदगाव, पाथरज येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच युनायटेड वे मुंबई जल संजीवनी, कर्जत प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप क्षीरसागर, प्रकल्प उपव्यवस्थापक मुक्ताजी कांबळे,प्रकल्प समन्वयक विवेक कोळी, कृषी तज्ज्ञ जोएब दाऊदी व समूह सहायक संतोष काटे हे उपस्थित होते.
Be First to Comment