सिटी बेल ∆ उरण ∆ सुनिल ठाकूर ∆
उरण तालुक्यात ८४ गावात नवसाला पावणारा गौरा ओळख असणारा पंचकृषित मोठ्या उत्सवाने शिवगौरा उत्सव सुरू आहे. दर वर्षी ह्या मंडळाच्या वतीने सामाजिक , शौक्षणिक , सांस्कृतिक असेविविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. तसेच यावर्षी सुद्धा महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शरीरातील ५४ टेस्ट , डॉ.भूषण शाक्यवीर मेडलाईफ फाऊंडेशन ह्यांच्याव्दारे चेकप केल्या. स्त्री रोग, आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ञ डॉ पल्लवी भिरुड , एन आर तोंगरे जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्र शासन पुरस्कृत , ह्यांच्या कडून मोफत औषध दिली .
मेडलाईफ फाऊंडेशन ,श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहायता संस्था आणि सत्ययोग बहुउद्देशीय सामाजिक संस्था च्या माध्यमातून शिवकृपा गौरा मंडळाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिराचे उद्घाटन प्रसंगी उरण वाहतूक शाखेचे अशोक गायकवाड , उपसरपंच सुजित म्हात्रे , विश्वनाथ पाटील , महेंद्र पाटील, देवेंद्र पाटील मंडळाचे अध्यक्ष प्रशांत पाटील, सचिव सत्यवान भगत आणि सभासद उपस्थित होते.








Be First to Comment