लेडीज बार साठी कुप्रसिद्ध कोन गाव येथे सापडले बांगलादेशी नागरिक : बारमध्ये बांगलादेशी मुली काम करतात का ? तपासण्याची गरज
सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆
बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करून वास्त्यव्य करणाऱ्या पाच बांग्लादेशींविरुद्ध पनवेल तालुका पोलिसांनी तालुक्यातील कोन गाव परिसरात कारवाई केली आहे.
कोणत्याही वैद्य प्रवासी कागदपत्राशिवाय अवैधरीत्या भारत- बांगलादेश सीमेवरून भारतीय हद्दीत घुसखोरी करून भारतात प्रवेश केला व पनवेल तालुक्यातील कोन हद्दीत पाच जण अनधिकृतरित्या वास्तव्य करत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनी रविंद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने धडक कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान लेडीज बार साठी कुप्रसिद्ध असलेल्या कोन येथे हे बांगलादेशी नागरिक सापडल्याने येथे असलेल्या लेडीज बार मध्ये बांगलादेशी मुली तर काम करीत नाहीत ना ? अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येथील बारमध्ये बांगलादेशी मुली काम करतात का ? हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.








Be First to Comment