खालापूर येथे गुरांना गुंगीचे औषध देवून पळविण्याचा प्रयत्न
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
तालुक्यातील गेले काही महिने गुरे चोरी होत असल्यांचे निदर्शनास येत आहे. मात्र काही शेतकरी वर्ग आपल्या जवळ असणारी पाळीव जनवारे शेतीचे कामे झाली की त्यांस चरण्यासाठी सोडून दिले जात असतांना, यांचाच फायदा गुरे चरणारी टोळी घेत आहे.गुरांना गुंगीचे औषध देवून त्यांस आपल्या जवळीक असलेल्या वहानांमध्ये घेवून जात असतात.असाच प्रकार कलोते येथे घडत असतांना येथिल नागरिक यांच्या सतर्कमुळे मोठा अनर्थ टळला.
गुरांना गुंगीचे औषध देवून त्यांस पळवून नेण्यात टोळी सक्रीय झाली असल्याचे पहावयास मिळत आहे.या गुरांना पाव किंवा खाद्य पदार्थ गुंगीचे औषध त्यांस देवून आपल्या जवळच्या वहांनामध्ये घेवून जात असतात.सदर दिलेल्या गुंगीचे औषध सात ते आठ प्रभाव राहत असल्यामुळे औषध यांची गुंगी उतरल्यास पुन्हा त्या पुर्व पदावर येत असतात.
गुरांना पावा मध्ये गुंगीचे औषध दिल्यामुळे सात ते आठ तासानंतर ते शुद्धिवर आल्यांचे कलोते येथिल ग्रामस्थांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.सदर गुंगीचे औषध दिलालेल्या गुरे व्यवस्थित असल्यांचे नागरिकांचे म्हणणे आहे.








Be First to Comment