सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
होप फाॅर चिल्ड्रेन (समुदाय विकास प्रकल्प) यांच्यावतीने इंदिरा नगर, शिवाजी नगर, नवनाथ नगर, आदिवासीपाडा येथील गरीब समाजासाठी मोफत वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचा 335 विद्यार्थ्यांनी व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला.
प्रकल्प अधिकारी महेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर उत्साहात पार पडले.या शिबिरात पनवेल महानगर पालिकेच्या वतीने डाॅक्टरांची टिम उपस्थित होती.तज्ञ डाॅक्टरांनी नागरिकांना आजारविषयक मार्गदर्शन केले.या शिबिरासाठी बिलिवर्स ईस्टर्न चर्च व मुंबई डायोसिसचे बिशप मार्टिन,अप्रेम एपिस्कोपा, नगरसेवक अजय बहिरा,जयेश परमार, रमेश वळवी आदी उपस्थित होते.
आरोग्याच्या बाबतीत काही नागरिक पाहिजे तेवढे गांभीर्य ओळखून घेत नसल्यामुळे अनेक समस्या उद्भवतात आणि आरोग्यविषयक संकटाना सामोरे जावे लागते, हेच धोरण स्वीकारून ह्या प्रकल्पा अंतर्गत शिबिर आयोजित करण्यात आल्याचे समजते.








Be First to Comment