सिटी बेल ∆ रामकृष्ण पाटील ∆ नंदुरबार ∆
श्री. आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयात भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी प्रतिमा पुजन केले.विद्यार्थ्यांनी जादा तास व शालेय तासिका घेऊन अध्यापन कायाॅचा अनुभव घेतला.नंतर प्रांगणात सर्व गुरुजनांचा गुलाबपुष्प व पेन देऊन विद्यार्थ्यांनी गुरू गौरव केला. विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व तर विद्यार्थी-शिक्षकांनी वर्गाध्यापनाचा अनुभव व्यक्त केला.
शिक्षकदिनाचे मुख्याध्यापक चि.तेजस पाटील याने विविधांगी अनुभव तसेच झालेल्या धावपळीचे वर्णन रंजकतेने केले.कार्यक्रमाचे व्याख्याते डी.बी.भारती यांनी ‘शिक्षकदिनाचे महत्त्व व आजची शिक्षकांप्रतीची भूमिका’ विषयावर व्याख्यान दिले. अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांच्या शिक्षकी भूमिका व अनुभवांवर मनोगत व्यक्त करून डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रतिक्षा कुभांर, कु. रुपाली पाटील, कु. हर्षदा पानपाटील, कु. पुनम कोळी आभार कु. भाग्यश्री पाटील हिने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इ.९वी, १०वीच्या विद्यार्थ्यांनी तसेच उपशिक्षक के.पी.देवरे,एम.डी.नेरकर, वाय.डी. बागुल,व्ही.बी.अहिरे, एस.एच.गायकवाड,आर.एम.पाटील, एम.आर.भामरे,एस.जी. पाटील यांनी परिश्रम घेतले.








Be First to Comment