Press "Enter" to skip to content

विवाहबाह्य प्रेमसंबंधातुन पुनम चा खुन !

६ तासांच्या आत संशयित आरोपीला मुरूड पोलिसांनी केली अटक

सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆

मुरुड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धनगर वाडी ते महालोर गावाकडे जाणा-या रस्ता चे बाजूला नागशेत गावचे जंगलात महिलेचा खून करून मृतदेह जाळण्यात आला आहे. मुख्य रस्त्यापासून अवघ्या दोनशे फुटांवर हा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

ही बातमी मुरुड पोलिस निरीक्षक -नितिन गवारे यांना कळताच सहाय्यक फौजदार- सचिन वाणी, पोलिस नाईक- विलास अंबेतकर, पोलिस नाईक- सुरेश वाघमारे, पोलिस नाईक- सागर रोहेकर, पोलिस हवालदार-सतोष पाटील, पोलिस शिपाई- सागर रसाळ आदिंसह आपल्या सहकारी यांच्यासाहित घटनास्थळी येऊन पाहणी केली असता हा खुन असुन अज्ञात व्यक्ती विरोधात भा.द.वि.कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संवशीत आरोपीला ६तासाच्या आत पकडण्यात यश आले.

आरोपी – सचिन थळे

सविस्तर वृत्त असे आहे की, विक्रांत पाटील राहणार -नवखार ता.अलिबाग ‌यांनी मांडवा पोलिस ठाण्यात आपली पत्नी – पुनम विक्रांत पाटील (वय22वर्षे) बेपत्ता आहे अशी तक्रार गेल्या रविवारी देण्यात आली होती.या बाबत जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्या मार्फत चौकशी सुरू होती.
दिनांक 1 सप्टेंबर 2022 रोजी 3 वाजुन 1 मिनिटांनी फिर्यादी -पांडुरंग दौलत पानगळे ( रा.गोपाळवट ता.रोहा ) यांनी मुरुड पोलिस ठाण्यात फोन व्दारे एक अज्ञात महिलेचा जळलेल्या मृत अवस्थेत दिसत आहे ही माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक-नितिन गवारे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.सदर मयत महिला असुन ती अर्धवट जळल्याचा दिसुन आल्याने आरोपीला पकडण्याकरिता व पुरावे शोधण्याकरिता अलिबाग येथील डाॅग स्काॅड व अंगुली मृद्रा रायगड जिल्हा पोलीस दलाचे छायाचित्रकार प्रसन्न-जोशी यांना बोलवण्यात आले. व त्या बरोबर वैद्यकीय तपासणी करिता मुरुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. व पुढील तपासाला सुरुवात करण्यात आले.

दुर्दैवी पुनम हीचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह

तपासात ही बेपत्ता महिला पुनम विक्रांत पाटील असल्याचे निष्पन्न झाले. व पुढील तपास वेगाने होवुन संवशीत आरोपी – सचिन थळे यांला मांडवा येथुन ताब्यात घेण्यात आले.
मृत महिला पुनम विक्रांत पाटील वय २३ व संशयित आरोपी सचिन थळे यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. गेल्या रविवारी मयत महिला व आरोपी यांच्यात कोणत्या तरी कारणांवरून भांडण झाल्याने त्या रांगात संशयित आरोपी याने मयत हिस जिवेठार मारुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने जंगल भागात मयत हिच्या प्रेतावर लाकडे रचुन जाळुन पुरावा नष्ट करण्यासाठी तिला पेटवून देण्यात आले परंतु मयत पुर्णतः न जळल्यामुळे माहिती समोर आली आणि संवशीत आरोपीला पकडण्यात यश प्राप्त झाले.

या दमदार कामगिरीमुळे मुरुड पोलिस ठाण्याचे निरीक्षक -नितिन गवारे व त्यांच्या टिमचे कौतुक होत आहे.
सदर मृतदेह मुरुड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ यांनी घटनास्थळी विच्छेदन करण्यात आले.

पुढील तपास पोलीस अधीक्षक-अशोक दुधे,अपर पोलीस अधीक्षक-अतुल झेंडे व उपविभागीय पोलिस अधिकारी जयदिश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड पोलिस ठाण्याचे निरीक्षक -नितिन गवारे करित आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.