Press "Enter" to skip to content

गळ्यातील सोन्याच्या चैनीसाठी मित्रांनीच केला मित्राचा खून

सिटी बेल ∆ नागोठणे ∆ याकूब सय्यद ∆

मित्राच्या गळ्यातील चैन चोरण्याच्या उद्देशाने मित्रानेच मित्राचा खून केल्याची खळबळजनक घटना नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी २४ तासाच्या आत आरोपीची धरपकड केली आहे.

नागोठणे येथील गवळ आली मध्ये राहणाऱ्या साहिल संजय कडू(१८) या तरुणाला त्याचाच मित्र प्रितेश गजानन केदारी (२३ ) या तरुणाने गळा आवळुन ठार केल्याची खलबल जनक घटना घडली . या बाबत सविस्तर माहिती अशी की साहिल व प्रेतेश हे जवळचे मित्र होते. प्रितेशवर कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठी प्रितेश चिंतेत होता. त्याच वेळी त्याच्या डोक्यात त्याचा मित्र साहिल याच्या गळ्यातील चैन चोरण्याचा विचार आला. यासाठी प्रितेश ने साहली सोबतची जवळीक अधिक वाढवली.दि.२९ रोजी मैत्रीचा फायदा घेत प्रितेश हा साहिल ला घेऊन को.ए.सो.हायस्कुल पुढील वासगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस आतील भागात पायवाटेने जाणाऱ्या जंगलात घेऊन गेला. त्याने साहिल याच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने खेचण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीत आरोपी प्रितेश याने आपल्या जवळील दोरीने साहिल याचा गळा आवळून त्यास ठार केले. सदर चा गुन्हा हा नागोठणे पोलीस ठाणे मिसिंग रजिस्टर केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासा मध्ये मित्रानेच मित्राचा खून केल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत नागोठणे पोलीस ठाण्यात गु. र.नं.०१०९/२०२२ भा. दं.वि. क.३०२,३९२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन जगताप करत आहेत.सदर चा गुन्हा हा आरोपीचे मोबाईल कॉल वरून व आरोपीने सोनारा कडे मयताचे गळ्यातील चैन विकण्याचा प्रयत्न केला त्यावरून उघडकीस आला आहे.

सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मा पोलिस अधीक्षक अशोक दुधे.अती.पोलिस अधीक्षक अतुल झेंडे,उप विभगीय पोलिस अधिकारी किरण सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक राजन जगताप, पोलीस उपनिरीक्षक नारायण चव्हाण, पोह.ढेने,पोहवा.प्रमोद कदम, पोहव. विनोद पाटील,पोह.संतोष पाटील, पोह.गणेश भोईर,पो.ना.नितेश पाटील, म.पो. ह.सारिका म्हात्रे,पो.शी.सत्यवान पिंगळे म पो.ना.गायकवाड,चालक पो.ह.महाले,गंगाराम डुमने यांनी खूप मोलाची कामगिरी करून 24 तासाचे आत मनुष्य मीसिंग चे तपासातून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपी याला न्यायालायत हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.