कर्जत नगर परिषदेच्या वतीने शारदा मंदिर मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने कर्जत नगर परिषदेच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, ट्रय कलर स्पर्धा, कब्बडी स्पर्धाचे आयोजन केले होते.

या सर्व स्पर्धाचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शारदा मंदिर च्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी. उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेवक बळवंत घुमरे, नगरसेविका संचिता पाटील तसेच कर्जत नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली किसवे यांनी उपस्थितांचे स्वागत यांनी केले.
याप्रसंगी नगरसेवक बळवंत घुमरे, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रफुल्ल देशमुख व विजय सावंत यांनी केले. तर श्रद्धा जामघरे यांनी आभार मानले.








Be First to Comment