मोहोपाड्यातील धनंजय गीधने अत्यंत ज्वलनशील आणि घातक रसायन गळती रोखली
सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
वीस टन एलपीजी वाहून नेणा-या टॅकरचा व्हाल्वला लिक (गळती) झाल्याची खबर मिळताच जबाबदारीने उरण येथे वेळेत पोहचून व्हाल्व बदलून पुढील हानी टाळण्याचे कर्तव्य मोहोपाड्यातील धनंजय गीध याने अतिशय चाणाक्ष पध्दतीने करून गॅस टॅकर हाताळून अनर्थ टाळला.गॅस टॅकरचा व्हाल्व लिकेज झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले होते.अत्यंत ज्वलनशील आणि घातक रसायनाचा लिकेज थांबवण्यासाठी धनंजय गीध यांना बोलविण्यात आले.यावेळी धनंजयने घटनास्थळी पोहचून गॅस टॅकरचा व्हाल्व बदलून मोठी दुर्घटना टाळली.यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.
धनंजयने याअगोदर तामिळनाडू , मल्हारपेठ पंढरपूर आदी भागात अत्यंत ज्वलनशील रसायन भरलेले गॅस टॅकरची गळती थांबविल्या ने त्यांना पोलिस अधीक्षक अशोक दुधे , तहसिलदार आयुब तांबोळी यांनी सन्मानित केले आहे.
Be First to Comment