सिटी बेल ∆ नागोठणे ∆ याकूब सय्यद ∆
नागोठणे विभागातील कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील चार आदिवासी वाड्या आहेत कातळावाडी भपक्याचीवाडी पायरवाडी ऐकलघरवाडी करंजवाडी बरणीचीवाडी या वाड्यानवर जाणारा रस्ता हा अवघड असल्यामुळे एखाद्या व्यक्ती आजारी पडला तर रात्री-अपरात्री त्याला दवाखान्यात घेऊन जाण्याकरिता अवघड परिस्थिती निर्माण होत असल्याने आदिवासी बांधवांकडून बोलले जात आहे.
त्याच अनुषंगाने आदिवासी वाडीवरचे लोकांना आरोग्य उपचाराकरिता सवलतीचे व सोयीचे मार्ग नसल्याने वारंवार आदिवासी बांधव प्रशासनाकडे डोळे लावून पाहत होते त्याचबरोबर अपेक्षा करत होते आदिवासी बांधवांची अडचण पाहता जिल्हाअधिकारी महेंद्र कल्याणकर रायगड अलिबाग यांनी तत्काल आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची दखल प्रशासनाने घेऊन रोहा तालुका कोंडगाव ग्रामपंचायत मध्ये आरोग्य शिबिराचे प्रशासनाने आयोजन केले.
त्या आरोग्य शिबिरात शंभरपेक्षा अधिक लोकांनी सहभाग नोंदविला होता. या आरोग्य शिबिरात डोळे तपासणी, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, हातापायाचे गुडघे तपासणीसाठी दहा ते बारा असे 12 डॉक्टरची टीम कोंडगाव ग्रामपंचायत जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांच्याकडून लोकांच्या आरोग्य तपासणी करिता पाठविण्यात आले.
यावेळी आदिवासी महिला त्याच बरोबर वयोवृद्ध पुरुष असे एकूण शंभरपेक्षा अधिक लोकांनी या आरोग्य शिबिरात भाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.
आदिवासी बांधवांच्या आरोग्य शिबिराची तपासणीकरिता डॉक्टर अशिष दुवे, डॉक्टर नचिकेत पाटील, डॉक्टर शेळके, डॉक्टर सलमा मुकादम, डॉक्टर नंदू म्हात्रे, डॉक्टर अरविंद माटल, डॉक्टर सुशील सायकर, डॉक्टर न्यानदिप भोईर, डॉक्टर प्रतिम सुतार, डॉक्टर कैलाश सोमवंशी, डॉक्टर प्रथमेश राणे, डॉक्टर सुरज सुरळकर इत्यादी डॉक्टर आरोग्य शिबिरास उपस्थित होते.
रोहा तालुक्यातील कोंडगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनंत वाघ यांनी प्रशासनाचे मनपूर्वक आभार व्यक्त केले.








Be First to Comment