एन.जी.ओ बिंग गुड फॉन्डेशन वतीने शाळेय सहित्य वाटप
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
शाळेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध संस्था हातभार लावत आहे.यामुळे विद्यार्थ्यांना शाळेय साहित्य उपलब्ध होत असते.कोकण एज्युकेशन सोसायटी माध्यमिक शाळा माजगांव येथे आठवी ते दहावी शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बॅग छत्री तसेच शाळेय साहित्य एन.जी.ओ बिंग गुड फॉन्डेशन यांच्या माध्यमातून देण्यात आले.पालकांना आपल्या मुलांचा शिक्षणांसाठी लागणारे साहित्य या संस्थे च्या माध्यमातून मिळाल्यांने विद्यार्थी आणी पालक वर्ग यांच्या चेहऱ्यावर समधानांचे हाव भाव निर्माण झाले होते.
यावेळी व्यवस्थापक वैजंती ठाकूर, यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेय साहित्य देण्यात आले.सातत्याने वाढत जाणारी महाघाई यामुळे प्रत्येक पालक वर्गांची आपल्या मुलांना शिक्षण देतांना तारेवरची कसरत करावी लागत असते.मात्र त्यांच्या शिक्षणांचा खर्चाचा हातभार लावावा या उद्दात विचारांतून हे साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रूप ग्राम पंचायत माजी उपसरपंच राजेश पाटील, आर.पी.आय.रायगड जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कांबळे,कोएसो मुख्याध्यापक – गौतम कांबळे,शिक्षक – बीपीन पाटील,म्हात्रे सर,पाटील मॅडम अदि उपस्थित होते.








Be First to Comment