सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆
उरण तालुक्यातील पाले गावामध्ये काही भागांमध्ये विदयुत खांब (पोल) हे जास्त अंतरावर असल्यामुळे संबंधित राहणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. तरी त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पाले गावासाठी 10 नवीन विदयुत खांब (पोल) मिळावे. तसेच काही वर्षा पूर्वी पाले आवरे रोड लागत दोन नवीन विदयुत खांब (पोल) बसविलेले आहेत. पण त्यावर अद्याप विद्युत तारा खेचल्या नाहीत.आणि त्यामुळे तेथील नागरिकांना सुद्धा लांबून विदयुत व्यवस्था करावी लागते.तरी या सर्व समस्या सोडविण्यासाठी महावितरणाने ग्रामस्थांना, नागरिकांना सहकार्य करावे व ग्रामस्थांच्या सर्व समस्या सोडवाव्यात अशी मागणी भाजपा चिरनेर जिल्हा परिषद युवा चिटणीस पंकेश बाळकृष्ण म्हात्रे यांनी महेश जाधव- कनिष्ठ अभियंता महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण उरण विभाग यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.

यावेळी पंकेश म्हात्रे भाजपा चिरनेर जिल्हा परिषद युवा चिटणीस, अमित म्हात्रे भाजपा गाव अध्यक्ष, प्रदीप म्हात्रे भाजपा युवा उपाध्यक्ष पाले, प्रणय म्हात्रे यावेळी आदी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी कनिष्ठ अभियंता महेश जाधव यांनी हे समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.








Be First to Comment