सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆
श्री संतसेना महाराज नाभिक सामाजिक संस्था उरण तर्फे उरण तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून श्री संतसेना महाराज पुण्यतिथी सोहळा – 2022 उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी 11 च्या सुमारास उरण शहरात श्री संतसेना महाराज की जय असे जयघोष करत प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री संत सेना महाराज मार्ग उरण शहर येथे नामशिळेला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडण्यात आले. व श्री संतसेना महाराज यांचा जयजयकार करण्यात आला.त्यानंतर तेरापंथी हॉल,वाणी आळी, उरण शहर येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कारही करण्यात आला.

सर्व नाभिक समाजातील नागरिकांना समाजबांधवांना एकत्र आणण्याचे काम श्री संत सेना महाराज नाभिक सामाजिक संस्था उरणच्या माध्यमातून करण्यात आले असून कार्यक्रमानिमित्त सर्व नाभिक समाज यावेळी एकत्र एकवटला. एकत्र येत सर्वांनी श्री. संतसेना महाराज पुण्यतिथी निमित्त श्री संतसेना महाराजांच्या कार्याचे स्मरण करून पूजा अर्चा केली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संतसेना महाराज नाभिक सामाजिक संस्था उरण या संस्थेचे अध्यक्ष विनोद पवार, उपाध्यक्ष विजय जाधव, सचिव रामचंद्र शिंदे, खजिनदार-शैलेंद्र पंडित, ज्येष्ठ सल्लागार – मधुकर चव्हाण, प्रमोद मुकादम, सदस्य- संदिप जाधव,रविंद्र मुकादम, प्रविण मुकादम, संगिता जाधव, सारिका पंडित, दिपाली शिंदे,जयेश जाधव, कमळाकर कडू,सतीश शिंदे, सुरेश आपणकर, सुरेश चव्हाण, सुरेश शिंदे आदी संस्थेचे पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.








Be First to Comment