Press "Enter" to skip to content

रोटरीकडून गरोदर महिलांसाठी मोफत एएनसी शिबिर संपन्न

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

रोटरी व रोट्रॅक्ट क्लब ऑफ रसायनी पाताळगंगा आणि गुड हेल्थ हॉस्पिटल रिस यांच्या संयुक्त विद्यमाने गरोदर महिलांसाठी फ्री एएनसी शिबिर त्यामध्ये फ्री रक्त तपासणी ,सोनोग्राफी व औषधें मोफत देण्यात आली.

रसायनी परिसरातील एकूण ७० महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिराचे उदघाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसाद रोकडे यांच्याहस्ते करण्यात आले असून यावेळी प्रायमाचे पदाधिकारी व काही सदस्य डॉ अमित चव्हाण,डॉ संगीता जैन,रो रोहित कदम,डॉ विलास कुलकर्णी हे देखील उपस्थित होते.

हे सर्व तपासणी करण्यासाठी १५०० /-रुपये खर्च येतो पण या सर्व सुविधा रोटरीकडून उपलब्ध करून देण्यात आल्या असून या शिबिरासाठी रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष अमित शाह, फर्स्ट लेडी मित्तल शाह,सेक्रेटरी रो डॉ धीरज व डॉ स्विटी जैन ,माजी अध्यक्ष रो गणेशजी काळे,रो बाळकृष्ण होणावळे सर व अनुराधा होणावळे सिस्टर,डॉ रो मिलिंदजी भगत ,रो डॉ लेखा उचिल, रो सुशांतजी उचिल व रोट्रॅक्ट प्रेसिडेंट समृद्ध ,सेक्रेटरी नेहा व अन्य ४-५ रोट्रॅक्टर उपस्थित होते.

या शिबिरासाठी ज्याचे भरपूर सहकार्य केले त्या रोटरीच्या सदस्या रो डॉ लेखा , सुशांत व समृद्ध उचिल कुटूंबीयाचे अध्यक्ष रोटरीयन अमित शाह यांनी आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.