नागोठणे पोलिसांच्या गावठी दारुविरोधी मोहिमेत काळकाई चेराठी जंगलातील तीन हातभट्ट्या उध्वस्त
सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆
नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दितील चेराठी, काळकाई लगतच्या जंगल परिसरातील सुरु असलेल्या गावठी दारूच्या तीन हातभट्टी नागोठणे पोलिसांच्या पथकाने उध्वस्त केल्या आहेत.
गावठी दारु विरोधी मोहिमेचाच एक भाग म्हणून नागोठणे पोलिस ठाण्यात नव्यानेच रूजू झालेले पो.नि. राजन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाणे अंमलदार व पथकाने सकाळी ८ वा.च्या सुमारास धाड टाकून अवैधरित्या सुरु असलेल्या गावठी दारूच्या तीन हातभट्ट्या उध्वस्त करुन २७ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला.
नागोठणे पोलिसांच्या या धाडीत चार पत्राच्या टाक्यांमध्ये प्रत्येकी १०० लिटर असे ४०० लिटर गूळमिश्रित रसायन, तसेच तीन प्लास्टिकच्या ड्रममध्ये प्रत्येकी ५० लिटर असे एकूण गूळमिश्रित १५० लिटर रसायन
असे एकूण ५५० लिटर गूळमिश्रित रसायनचे प्रत्येकी ५० रूपये याप्रमाणे एकूण २७ हजार ५०० रूपये गुळ मिश्रित रसायन असलेली गावठी दारू व सर्व मुद्देमाल वाहतुकीस अवजड व अवघड असल्याने हा मुद्देमाल जागीच नष्ट करून पेटवून देण्यात आला.
या मोहिमेत नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. राजेश जगताप,
पो.ना. नितीन गायकवाड, पो.ना. गंगाराम डुमणे, पो.शि. अशिष पाटील, पो.शि. सत्यवान पिंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान नागोठणे पोलिसांनी सुरु केलेल्या गावठी दारु विरोधी मोहिमेचे संपूर्ण नागोठणे विभागातील जनतेकडून स्वागत करण्यात येत असून पोलिसांनी या गावठी दारु माफियांचा कायमचा बंदोबस्त व नायनाट करुन गावठी दारुला नागोठणे विभागातून हद्दपार करुन त्रस्त झलेल्या महिला वर्गाचे आशीर्वाद मिळवावेत अशी मागणीही नगरिकांतून होत आहे.
Be First to Comment