कोन ग्रामपंचायतीकडून विविध क्षेत्रातील मान्यवर सन्मानित
सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोन रा.जि.प.शाळेत दि.13 ते 15 यादिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम ग्रामस्थ आणि ग्राम पंचायत कमिटी आणि सरपंच यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रम झाल्यानंतर ग्रामपंचायत कोन कमिटीतर्फे कार्यालयाच्या वरील प्रशस्त असलेल्या सभागृहात सामाजिक कार्य करणाऱ्या कोन गावच्या समाज मंडळींना शाल,श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी श्री हनुमान प्रसादिक वारकरी भजन मंडळ,श्री हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळ,श्री दुर्गा माता संगीत भजन मंडळ,जय दुर्गा माता संगीत भजन मंडळ,या चारही मंडळाच्या अध्यक्षांना अनुक्रमे ह.भ.प.रामदास बुवा म्हात्रे,नारायण घरत, अशोक खंडू म्हात्रे, निलेश न.म्हात्रे सरपंच या सर्वांना व्यासपीठावर आमंत्रित करून,प्रत्येकी एक ट्रॉफी देण्यात आली.ही भजनी मंडळी आपल्या भजनातून समाज प्रबोधनाचे एक सामाजिक कार्य करत असतात.गावच्या सांप्रदायिक आणि धार्मिक कार्यात यांचे फार मोठे योगदान असते.
गावात कोणाकडे मयत झाले असेल तर त्या संबंधित लागणारे साहित्य व विधिवत पूजा करण्याचे सामाजिक कार्य करणारे लडकू गणू म्हात्रे व राजू हरी शिसवे हे दोघे त्या दुःखी परिवारांसाठी झटत असतात.ते दोघे त्या स्वर्गीय व्यक्तीसाठी फार मोठे मोलाचं काम करत असतात,म्हणून त्या दोघांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच शेतावर काम करणारी शेतकरी मंडळी यांना साप,विंचू चावले असता त्यांचे अंगावरील विष उतरवण्यासाठी आयुर्वेदिक औषध देण्याचे सामाजिक काम गावचे रामचंद्र देहू म्हात्रे करत असतात.या सामाजिक कार्याबद्दल त्यांनाही ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आले.
रिलायन्स पॉलिएस्टर कंपनीतून रिटायर्ड होऊन गावी घर बांधून राहत असताना गावात श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोध या ग्रंथावर आधारित प्रवचन देऊन समाजात होत असलेल्या चांगल्या वाईट गोष्टींपासून पण नेहमीच दूर राहिले पाहिजे वाईट गोष्टी ह्या नेहमीच माणसाला आकर्षित करत असतात.वाईट गोष्टींत जर आपण अडकलो,तर त्यांतून बाहेर पडणे खूप कठीण असतं.वाईट गोष्टीमुळे चांगली चांगली संसार उध्वस्त होत असतात.समाज परिवर्तनाचे हे सुंदर कार्य आपल्या बैठकीच्या माध्यमातून,प्रवचनाद्वारे करण्याचे कार्य अरुण खंडू म्हात्रे हे करत असतात. या सामाजिक कार्याबद्दल त्यांना शाल,श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
पांडुरंगाची भक्ती का आणि कशी करावी ? निस्वार्थ पणाने केलेली भक्ती,आपल्याला ईश्वरापर्यंत नेत असते. ज्ञानोबा माऊली,संत तुकाराम,संत एकनाथ,संत मुक्ताबाई अशा या थोर संतांची अभंग अगदी तोंडपाठ असून, आपल्या सुंदर गोड वाणीतून आपल्या कीर्तनातून, प्रवचनाद्वारे, खेडोपाड्यात जाऊन, समाजातील लहान थोरांना सांगण्याचे कार्य ह.भ.प.सुरेश बाळा पाटील हे करत असतात.त्यांनाही शाल,श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
तारखेवर तारखा,नाही फी चं देणं. कायदे विषयक वकिली सल्ला आणि मार्गदर्शन मोफत देण्याचे छान आणि सुंदर कार्य ऍडव्होकेट दत्तात्रेय पांडुरंग घरत हे करत असतात. या सुंदर सामाजिक कार्याबद्दल त्यांनाही शाल,श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. माणूस म्हणून होणारे आजार ते दूर करण्यासाठी रुग्णांना मोफत गोळ्या,औषधे देऊन त्यांना झालेले आजार हे करण्याचे मोफत कार्य आपल्या गावचे डॉक्टर अमर काळुराम शिसवे हे करत असतात. या सामाजिक कार्याबद्दल त्यांनाही शाल,श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
एक कवी,लेखक आणि पत्रकार म्हणून नाव लौकिक असणारे तसेच ज्यांना कोणीच नाही,त्यांचा तो एकमेव आधार असलेले गावचे पत्रकार अशोक नामदेव घरत हे लेखणीच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवून न्याय मिळवून देण्याचे कार्य करीत असतात. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल, त्यांनाही शाल,श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
पाणी एक जीवन आहे.माणसाला जगण्यासाठी अन्न,पाणी आणि निवारा तीन गोष्टींची गरज असते. पाणी हा घटक जरी नसेल तरी कठीण होऊन जाते.कोन ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा करणारे आपल्या गावचे अत्यंत प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षपणे ड्युटी बजावणारे पंचायत कर्मचारी दत्तात्रेय सखाराम म्हात्रे हे ८ तासाच्या ड्युटी नंतरही,जास्त तास गावाच्या कामासाठी देणारे सतत झटत असणारे आणि महिला वर्गाचा आन,बाण,शान आणि मान असणारे श्री.दत्तात्रेय स.म्हात्रे यांनाही चांगल्या सेवेबद्दल शाल,श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या पोलीस सेवेबद्दल बोलावं तेवढं कमी असतं. अशीच एक सेवा देण्यासाठी गावोगावी पोलीस पाटील म्हणून शासनाकडून जी नेमणूक झालेली असते.त्यांतीलच एक आपल्या गावचे पोलीस पाटील योगेश बाळकृष्ण म्हात्रे हेही आपल्या गावासाठी अत्यंत चांगली सामाजिक सेवा देत असतात. त्यांच्या या सुंदर कार्याबद्दल त्यांनाही शाल,श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर रा.जि.प.शाळा कोनच्या वर्ग शिक्षकांनी इ.१ ली ते ४ थी.पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध विषयांवर आधारित स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या त्या विषयांच्या प्रथम,द्वितीय,तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी ४० बक्षिसे ग्रुप ग्रामपंचायत कोन तर्फे शालोपयोगी भेटवस्तू म्हणून त्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आली.नंतर स्वातंत्र्यावर आधारीत मान्यवरांची भाषणे झाली आणि सर्वात शेवटी अध्यक्षीय भाषण हभ.प.शांताराम माऊली म्हात्रे यांनी केले त्या नंतर आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.








Be First to Comment