Press "Enter" to skip to content

ओवळे येथील चाळीत राहत होता बंगालचा गुन्हेगार

पश्चिम बंगाल मधील सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆

पश्चिम बंगाल परिसरात गुन्हे करून पनवेल परिसरातील प्रथम उलवा नंतर ओवळे येथे वास्तव्यास राहणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी पश्चिम बंगाल पोलिसांच्या साथीने सापळा रचून ताब्यात घेतले आहे .

पश्चिम बंगाल येथील नकाशे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नुकतेच सराईत गुन्हेगार मोतलीफ तारजेन शेख वय ( ३६ ) याने तेथील सोन्याच्या पेढी मध्ये शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकला होता व तेथे लूटमार करून पनवेल परिसरातील प्रथम उलवा नंतर ओवळे येथे वास्तव्यास राहिला होता . त्याच प्रमाणे इतर मोठ्या प्रमाणातील गुन्हे सुद्धा त्याच्या वर दाखल होते .त्यामुळे पश्चिम बंगाल येथील नकाशे पोलीस त्याच्या मागावर होते .

दरम्यान सदर सराईत गुन्हेगार पनवेल जवळील ओवळे याठिकाणी एका चाळीत राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानुसार, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या कडे मदत मागितली .

यावेळी गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध पोउपनि अभयसिंह शिंदे ,पोहवा रविंद्र राऊत, पोना परेश म्हात्रे,पोना महेंद्र वायकर, पोना विनोद देशमुख,पोना रविंद्र पारधी,पोशि विवेक पारासुर,पोशि प्रसाद घरत आदींच्या पथकाने सुरु केला असता तो याठिकाणी सॅनट्रिंगची कामे करत होता याची माहिती मिळताच त्यानुसार सापळा रचुन त्याला ताब्यात घेऊन पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे .

घर भाड्याने देताना मालकाने पोलीस व्हेरिफिकेशन केले होते का ? ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌ ‌अशाप्रकारे परराज्यातील नागरीकांना घर भाड्याने देताना या घर मालकाने पोलीस व्हेरिफिकेशन केले होते का ? हा प्रश्न आता या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. पनवेल तालुक्यातील अनेक गावांमध्ये चाळी बांधून घरे भाड्याने दिली जात आहेत. मात्र अनेक घर मालक आजही या भाडेकरूंचे पोलीस व्हेरिफिकेशन करत नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे हे गुन्हेगार या चाळींचा आश्रय घेत आहेत. या गुन्हेगारास घर भाड्याने देताना घर मालकाने सदर चे पोलीस व्हेरिफिकेशन केले होते का हे पाहणे गरजेचे आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.