सिटी बेल ∆ श्रीवर्धन ∆ केतन माळवदे ∆
येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालयात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी सकाळी, राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे विद्यार्थी, स्वयंसेवक, प्राध्यापक व कर्मचारी या सर्वांनी संपूर्ण महाविदयालयाचा परिसर स्वच्छ केला, या स्वच्छता मोहिमेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा. किशोर लहारे व प्रा. वात्मीक जोंधळे यांनी विशेष नियोजन करुन ही स्वच्छता मोहीम यशस्वीपणे पार पाडली.
या दिवशी महाविद्यालयाच्या महिला विकास मंचातर्फे विद्यार्थी-विदयार्थीनींसाठी ‘रांगोळी व भित्तीचित्रं स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री शांतीलाल जैन व श्री नितिन सुर्वे यांच्या हस्ते फित कापून पार पडले, या वेळी त्यांनी विदयार्थ्याच्या कलात्मकतेचे कौतुक करुण एका मुक-बधिर विष्यार्थ्याच्या कलेने प्रभावित होऊन उत्स्फुर्तपणे रोख स्वरुपात बक्षिस दिले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. दिपाली पाठराबे व सांस्कृतिक विभाग प्रमुख डाॅ सौ.नाझरे यांनी केले होते, याच दिवशी वाणिज्य मंडळाने ‘भित्ती चित्र’ व ‘लेख’ स्पर्धेचे आयोजन केले होते.
वाणिज्य विभाग प्रमुख, डॉ. कल्याणी नाझरे व अकाऊंट विभाग प्रमुख, श्री राजु गोरूले यांनी विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला चालना देणारे विविध वाणिज्य विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते.
या नंतर ग्रंथालयाची फित कापून सीडीसी मेंबर श्री नितिन सुर्वे यांच्या हस्ते, ‘ग्रंथालय दिन’ ग्रंथपाल, प्रा. सागर कुंभार व प्राचार्य, डाॅ. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
याच दिवशी दुपारी १२.०० वाजता महाविद्यालयाच्या वाड:मय मंडळाअंतर्गत कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विध्यार्थ्यांसाठी ‘श्रावणसरी’ हा काव्यमय व बहारदार कार्यक्रम, प्राचार्य, डॉ श्रीनिवास जोशी यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीवर्धन येथिल प्रसिद्ध कवी, श्री सुनिल चीटणीस व सीडीसी मेंबर व कवी, श्री नितीन सुर्वे उपस्थित होते. त्यांनी काव्याचे प्रकार, काव्य गायन व काव्य कसे स्मरते या विषयी मार्गदर्शन करून आपल्या कवितांचे वाचन केले. या कार्यक्रमासाठी वाङमयमंडळाचे प्रमुख, प्रा. शंकर भोईर व प्रा. संतोष लंकेश्वर यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा संतोष लंकेश्वर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर, प्रा.शंकर भोईर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कनिष्ठ महाविदयालयाचे प्रा. नवज्योत जावळेकर यांनी सूत्र संचालन केले. या ‘श्रावणसरी’ कार्यक्रमामधे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या वेळी, प्राचार्य जोशी यांनी देखील कविता वाचन केले.
देशाच्या रौप्यमहोत्सवा निमित्त ‘ घर-घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील एन एस एस मंडळ सांस्कृतिक मंडळ, वाडमय मंडळ, महिला विकास मंडळ, कला, वाणिज्य व विज्ञान मंडळ या सर्व मंडळांनी विविध उपक्रम राबवून देशाच्या स्वातंत्र्य चळवळ व देशप्रेम या विषयी समाजात व विद्यार्थ्यांमधे जाणीव व जागृती करत असल्या बद्दल, आलेले अतिथी व प्राचार्य, डॉ. श्रीनिवास जोशी यांनी समाधान व्यक्त केले.








Be First to Comment