Press "Enter" to skip to content

“सरकारी नोकरीच्या संधी” या विषयावर मार्गदर्शन शिबीर

स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन उच्च पदावर अधिकारी व्हा. : तहसीलदार भाऊसाहेब अंधारे

सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆

एमपीएससी , युपीएससी माध्यमातून तरुणांना,युवकांना उच्च पदाच्या अनेक संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.मात्र योग्य संधी ओळखून अथक परिश्रम घेऊन त्या उच्च पदाचे ध्येय प्रत्येक तरुणाला गाठता येईल. त्यासाठी प्रत्येक तरुणांनी यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करून ह्या सुवर्णसंधीचा फायदा घ्या असे आवाहन उरणचे तहसिलदार भाऊ साहेब अंधारे यांनी उरण येथे केले.

उरण नगर परिषद, तहसिल कार्यालय उरण व शिक्षा डिफेन्स ऍण्ड स्पोर्टस ट्रेनिंग अकॅडमी बोकड़विरा यांच्या संयुक्त विद्यमाने आदय क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह , समाज प्रबोधन हायस्कूल उरण येथे सरकारी नोकरी कशा मिळवाव्यात, सरकारी खात्यामधील नोकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात होते.

यावेळी तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.तत्पूर्वी सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय धावपटू, एनआयएस अथलेटिक्स प्रशिक्षक आणि शिक्षा डिफेन्स अँड स्पोर्ट्स ट्रेनिंग अकॅडमी बोकडविराचे संचालक प्रशांत पाटील यांनी सदर शिबिराचे प्रास्ताविक केले.यावेळी त्यांनी ही भरती प्रक्रिया जिल्हानिहाय भरती असणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची पात्रता , कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत.आपली शारीरिक, मानसिक,पात्रता विकसित करणे का आवश्यक आहे याबाबत प्रस्तावना करताना माहिती दिली.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार भाऊसाहेब अंधारे म्हणाले की स्पर्धा परिक्षेसाठी जिद्द चिकाटी,सातत्य,मेहनत महत्वाचे असून 5 वी ते 12 वी पर्यंतचे सर्व शालेय पुस्तकांचा अभ्यास करावा जेणेकरून स्पर्धा परिक्षा अवघड होणार नाही व यशाचे श्रेय गाठता येईल.

यावेळी उपस्थित नायब तहसिलदार नरेश पेढवी यांनीही मार्गदर्शन करताना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेत सहभागी व्हावेत असे आवाहन करत विदयार्थ्यांना एखादी मदत लागली तर ती मदत करण्याचे देखील आश्वासन दिले. सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्व व त्यासाठी कशा पद्धतीने अभ्यास केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमातून सरकारी नोकरी कशी मिळवावी. त्यासाठी पात्रता काय असते. शैक्षणिक शारिरीक मानसिक पात्रता काय आहे. याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.पोलिस भरती एमपीएसी, यूपीएससी विषयी माहिती देण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे प्रस्तावना, सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा शिक्षा डिफेन्स अँड स्पोर्टस ट्रेनिंग ॲकॅडमी बोकडविराचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी केले. यावेळी समाज प्रबोधन शाळेचे मुख्याध्यापक निकम सर,विद्यार्थी पालक मोठ्‌या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा परिक्षेच्या संदर्भात विदयार्थ्यांना कोणतेही अडचण आल्यास स्पर्धा परिक्षेचे तज्ञ प्रशांत पाटील फोन नंबर 9769085540 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहनही यावेळी विदयार्थ्यांना करण्यात आले.सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षा डिफेन्स ऍण्ड स्पोर्ट्स ट्रेनिंग अकॅडमीचे संचालक प्रशांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.