सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆
15 ऑगस्ट 2022 या दिवशी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली.या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून उरण मधील “सूर उरणकरांचा” या ग्रुपमधील सर्व गायक कलाकारांनी देशभक्तीपर गीतांनी आपल्या सुरेल आवाजातून शहिदांना तसेच जवानांना आदरांजली वाहून काही निवडक प्रसिद्ध देशभक्तीपर गीते सादर केले.
हा कार्यक्रम मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल विमला तलाव उरण येथील हॉलमध्ये संध्याकाळी ठीक 4.30 वाजता आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी जवळजवळ 200 प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. अतिशय जल्लोषात आणि उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.
“सुर उरणकरांचा” या ग्रुपच्या संस्थापिका पूनम पाटेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम उरण मधील संगीत प्रेमींना एक पर्वणीच ठरली.गायिका पुनम पाटेकर यांच्यासह गौरी मंत्री, अनिता घरत, निमा भानुशाली, प्रज्ञा पेडणेकर आणि युगांती पाटील तसेच महेश घरत, सचिन वैद्य, विनोद ठाकूर, योगेश भस्मे,अंबरीश म्हात्रे, भरत शेळके, गणेश जाधव, दीनानाथ डांगे , उत्तमकुमार कडवे व राजेश डांगे इत्यादी कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजात गाणी सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन गौरी मंत्री यांनी केले.उरण शहर भाजपा प्रमुख कौशिक शहा यांनी हॉल तसेच मंडप स्पॉन्सर करून हातभार लावला.या कार्यक्रमात कीर्ती गोंधळी – सरस्वती संगीत क्लासेस तसेच रायगड भूषण पुरस्कार विजेत्या भाजप सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष गौरी देशपांडे,मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे संस्थापक विशाल पाटेकर , नगरसेविका प्रियांका पाटील, नगरसेवक राजू ठाकूर, जेष्ठ पत्रकार प्रवीण पुरो ,सोबतच अनेक इतर मान्यवर मंडळीनी उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहित केले.तसेच कु.सानिया वैद्य आणि प्रदीप सपकाळ यांनी तंत्रज्ञानाच्या कामात मदत केली.महेश घरत आणि सचिन वैद्य यांच्या विशेष मेहनतीने तसेच ग्रुप मधील सर्व कलाकारांच्या अथक मेहनतीने हा कार्यक्रम यशस्वी झाला.








Be First to Comment