Press "Enter" to skip to content

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून 38 जणांवर कारवाई

लाॅकडाऊन चे उल्लंघन, माक्स न लावणे, सोशल डिस्टंसींग न पाळणार्‍यांकडून दंड वसूल

# सिटी बेल लाइव्ह / रसायनी-राकेश खराडे #

सध्या संपुर्ण देशात, राज्यात व ग्रामीण भागात कोरोना महामारीचे महाभयंकर संकट ओढावले आहे.त्यातच काही दिवसांपुर्वी सागरी वादळामुळे न भुतो न भविष्यती अशा स्वरुपाची प्रचंड आर्थिक व नैसर्गिक हानी होऊन जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले आहे. यासाठी शासन आपल्या परीने नागरीकांमध्ये जनजागृती करून अथक उपाययोजना करत आहे.शहरांसह ग्रामीण भागातील खेड्यापाड्यांत नागरीकांमध्येही कोरोनाने आपली दहशत निर्माण केली आहे.रसायनी परीसरातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असणा-या वासांबे मोहोपाडा हद्दीत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी ग्रामपंचायतीने कडक पाऊल उचलले असून मास्क न वापरणा-या 36 जणांवर कारवाई करीत 15200 दंड वसूल केला तर बाजारपेठेतील दोन दुकानदारांकडून गि-हाईंकांसाठी सोशल डिस्टन्ससाठी उपाययोजना न केल्याने गि-हाईंक गर्दी करीत असल्याने मोहोपाडा बाजारपेठेतील दोन दुकानदारांवर कारवाई करीत प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारला आहे.पहिल्याच दिवशी वांसाबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने 38 जणांवर कारवाई करुन त्यांच्या कडून 17200 दंड वसूल केला आहे.यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीला रसायनी पोलिसांचेही सहकार्य लाभत आहे.
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनासंसर्ग वाढत असल्याने वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत ,पोलिस प्रशासन कोरोना रोखण्यासाठी अथक प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत आहे.यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई पुंडलिक पवार, उपसरपंच राकेश खारकर, ग्रामविकास अधिकारी संजय बडे तसेच सर्व सदस्य व कर्मंचारी ,स्वच्छता कमिटी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविधप्रकारे प्रयत्नशील आहे.यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्यावतीने सार्वजनिक ठिकाणी चेह-यावर मास्क/रुमाल न वापरल्यास पाचशे रुपये दंड , सार्वजनिक स्थली थुंकल्यास पाचशे रुपये दंड,सर्व दुकानदार व ग्राहक यांनी सामाजिक अंतर न ठेवल्यास दुकानदाराला एक हजार दंड,तसेच दुस-यांदा वर्तंन केल्यास भांदवि कलम 188,269 व 270 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 115 नुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल.तरी नागरिकांनी खबरदारी घेवून कोरोनाला हद्दपार कराण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.