सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असतानाच पेण तालुक्यातील केईएस लिटील इंग्लिश स्कूल व ईएनजी मिडीयम सेकंडरी स्कूल यांच्या माध्यमातून आज पेण शहरात मुलांची प्रभात फेरी काढून या फेरीच्या माध्यमातून मुलांनी स्वतंत्राच्या शूरवीरांना मानवंदना दिली.

यावेळी शाळेतील मुलांनी भारतीय स्वतंत्राच्या काळात ज्या देशभक्तांनी तसेच स्वतंत्र सेनानी आपल्या प्राण्यांची आहुती दिली अशांची आठवण सदैव आपल्या स्मरणात राहावी याकरिता त्यांचा पेहराव करून तसेच हातात भारताचा झेंडा फडकवीत संपूर्ण पेण शहरातील नागरिकांना यांचे दर्शन घडविले या प्रभात फेरीत मुलांनी जय जवान जय किसान, भारतीय स्वातंत्र्याचा विजय असो, हम सब एक है अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्ग ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.








Be First to Comment