Press "Enter" to skip to content

55 व्या सांस्कृतिक युवा महोत्सवाचा शुभारंभ

विद्यार्थ्यांनी शिस्ती बरोबरच कोणतेही काम करताना जीव ओतून करावे — डॉ. नितीन आरेकर

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

‘स्पर्धा म्हटली की जय पराजय होतच असतो. त्याकडे लक्ष न देता आपण आपले ध्येय गाठण्यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे. किती तरी सुरुवातीला अपयशी ठरले नंतर यशस्वी झाले आहेत. आपण शिस्तीला महत्व दिले पाहिजे. ज्याच्याकडे शिस्त आणि वक्तशीरपणा आहे तो खरा कलाकार आहे. विद्यार्थ्यांनी शिस्ती बरोबरच कोणतेही काम करताना जीव ओतून करावे म्हणजे यश निश्चित मिळते.’ असा सल्ला मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. नितीन आरेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

मुंबई विद्यापीठाच्या उत्तर रायगड विभागाच्या 55 व्या सांस्कृतिक युवा महोत्सवाचा शुभारंभ कर्जतच्या कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयात करण्यात आला. या महोत्सवात कर्जत, पनवेल, खालापूर, उरण तालुक्यातील 29 महाविद्यालयातील पंधराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या निमित्ताने घेतलेल्या स्पर्धांमध्ये सिकेटी महाविद्याल पनवेलच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पारितोषिके मिळवली.

पारितोषिक वितरण समारंभ मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. नितीन आरेकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी विद्यपीठ समन्वयक डॉ. निलेश सावे, संस्थेचे खजिनदार प्रदीपचंद्र श्रुंगारपुरे, महाविद्यालयीन विकास समिती सदस्य विजय मांडे, प्राचार्य डॉ. मोहन काळे, जिल्हा समन्वयक डॉ. पराग कारूळकर, डॉ. दीपक गायकवाड आदी उपस्थित होते.

डॉ. काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. सावे यांनी, ‘अतिशय चांगल्या प्रकारे युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवामध्ये आयोजित स्पर्धांमधूनच मोठ मोठे कलाकार तयार झालेले आहेत. राष्ट्रीय स्पर्धेचा विचार करता मुंबई विद्यापीठ म्हटल की अन्य विद्यापीठांच्या मनात धडकी भरते. त्यामुळे तुमच्यावर आता मोठी जबाबदारी आहे. ती तुम्ही नक्कीच पूर्ण कराल. यात शंका नाही.’ असा विश्वास व्यक्त केला. सूत्रसंचालन प्रा. मनीषा चौधरी यांनी केले. यावेळी विद्यार्थी, प्रचार, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेली महाविद्यालये :

रांगोळी – अभिनव ज्ञान मंदिर, महाविद्यालय कर्जत, कॉलाज – सिकेटी महाविद्यालय, पनवेल, कार्टुनिंग – सिकेटी महाविद्यालय, पनवेल, क्लाय मॉडेलिंग – सिकेटी महाविद्यालय, पनवेल, मेहेंदी – कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर कॉलेज ऑफ फार्मसी, कर्जत, ऑन द स्पॉट पेंटिंग – सिकेटी महाविद्यालय, पनवेल, इंडियन लाईट वोकॅल – पिल्लई महाविद्यालय, नवीन पनवेल, इंडियन ग्रुप सॉंग – सिकेटी महाविद्यालय, पनवेल, शास्त्रीय गायन – सेंट विल्फ्रेड फार्मसी महाविद्यालय पनवेल, क्लासिकल वादन – एमपीएस महाविद्यालय पनवेल, वेस्टर्न सोलो – सिकेटी महाविद्यालय, पनवेल आणि पिल्लई कला, विज्ञान महाविद्यालय पनवेल, वेस्टर्न इस्ट्रुमेंट सोलो – सिकेटी महाविद्यालय, पनवेल आणि कोंकण ज्ञानपीठ उरण कला आणि वाणिज्य महाविद्यालय उरण, नाट्यसंगीत – सिकेटी महाविद्यालय, पनवेल, स्टोरी रायटिंग ग्रुप ब – पिल्लई महाविद्यालय, पनवेल, स्टोरी टेलिंग ग्रुप अ – सिकेटी महाविद्यालय, न्यू पनवेल, डेबेट ग्रुप ब – सिकेटी महाविद्यालय, न्यू पनवेल, डेबेट ग्रुप अ – सिकेटी महाविद्यालय, न्यू पनवेल, एलोकशन ग्रुप ब – पिल्लई महाविद्यालय, पनवेल, एलोकशन ग्रुप अ – एमपीएएस महाविद्याल, पनवेल, मोनो ऍक्ट ग्रुप क – उरण महाविद्यालय, मोनो ऍक्ट ग्रुप अ – सिकेटी महाविद्यालय, पनवेल, स्किट ग्रुप क – सिकेटी महाविद्यालय, पनवेल, स्किट ग्रुप अ – सिकेटी महाविद्यालय, पनवेल, माईम – सिकेटी महाविद्यालय, पनवेल, एकांकिका हिंदी – पिल्लई महाविद्यालय, पनवेल, एकांकिका मराठी – कोंकण ज्ञानपीठ उरण कला आणि वाणिज्य महाविद्यालय, उरण,
क्लासिकल डान्स – कोंकण ज्ञानपीठ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, कर्जत, फोल्क डान्स – केएलई, कळंबोली

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.