कडाव येथील शिशु मंदिर शाळेचा अभिनव उपक्रम
सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या कडाव येथील शिशु मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकीय ज्ञानाबरोबरच दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहार समजण्यासाठी रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी बनविल्या सुमारे 400 राख्या बनविल्या.

इयत्ता 5 वी ते 7 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रथम राख्या बनविण्याचे प्रशिक्षण इयत्ता 7 वी च्या वर्गशिक्षिका करुणा तांडेल यांनी दिले. ह्या प्रशिक्षणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी सुमारे 400 राख्या बनवुन आपले कौशल्य दाखविले. शालेय विद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनविलेल्या राख्या विक्री करण्यासाठी विकण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली गुरव यांच्या संकल्पनेतुन शाळेच्या परिसरात 5 स्टॉल लावण्यात आले. पालकांना व परीसरातील लोकांना विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्या खरेदी करण्याचे आवाहन केले गेले. ह्या आवाहानाला परिसरातील नागरीकांनी उत्तम प्रतिसाद देऊन जवळपास 4500 रुपयांची राख्यांची खरेदी केली.
ह्या सर्व उपक्रमास शाळेतील विद्यार्थ्यांसह सर्व श्रेय वर्ग शिक्षकांना देखिल असुन सदर उपक्रमास पुष्पा मोहिते,अलका कोशे, अर्चना भोसले, प्रगती कडु,भाग्यश्री म्हात्रे,सोनाली पवार, पुनम गायकर, माया गंगावणे तसेच शिशु मंदिर शाळेचे शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत कुडे याचे व सर्व पालकवर्गाच्या सहकार्याने उपक्रम यशस्वी पार पडला गेला.








Be First to Comment