वरसुबाई बहूउद्देशिय आदिवासी सेवाभावी संस्था कर्जत यांच्या मार्फत शैक्षणिक साहित्याचे वाटप
सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
कर्जत तालुक्यातील दुर्गम डोंगरावर वसलेल्या रायगड जिल्हा परिषद शाळा पळसदरी (ठाकूरवाडी) येथील आदिवासी मुलांना वरसुबाई बहूउद्देशिय आदिवासी सेवाभावी संस्था कर्जत यांच्या मार्फत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सदरचे कार्यक्रमासाठी अध्यक्षा हिरा कावळे, सचिव कु.सायली हिले, खजिनदार रोहिणी सुपे, कार्याध्यक्षा वृषाली हिले उपस्थित होत्या. शाळेचे मुख्याध्यापक कैलास निकम यांनी संस्थेचे पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर, सदाशिव बांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले व संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment