Press "Enter" to skip to content

अमेरिकेत नोकरी लावण्याचे आश्वासन

पनवेलमधील तरुणीची दोन लाखांची फसवणूक

सिटी बेल ∆ पनवेल ∆ वार्ताहर ∆

अमेरिकेत रिसेप्शनिस्ट पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन देऊन एका भामट्याने पनवेलमध्ये राहणाऱ्या तरुणीकडून दोन लाख रुपये उकळून तिला कुठल्याही प्रकारची नोकरी न लावता तिची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

अभिजित तसेच, कांबळे असे या भामट्याचे नाव असून तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

फसवणूक झालेली २६ वर्षीय तरुणी पनवेलमध्ये कुटुंबासह राहण्यास असून ती दोन वर्षांपूर्वी तुर्भे येथील एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. तिची फसवणूक करणारा आरोपी अभिजित हा कांदिवली येथे राहण्यास असून तो ही तरुणी कामाला असलेल्या हॉटेलमध्ये नियमित जात होता. त्यामुळे त्याची या तरुणीसोबत ओळख झाली होती.

त्यावेळी अभिजितने तो अॅक्सिस बँकेत काम करत असल्याचे परदेशातील बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे काम तो करत असल्याचे तरुणीला सांगितले होते. त्यावेळी अभिजितने त्याच्याकडे अमेरिकेत रिसेप्शनिस्टच्या भरतीचे काम आल्याचे सांगून त्या ठिकाणी तरुणीला नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून बायोडेटा मागवून घेतला होता.

त्यानंतर अभिजित याने ऑक्टोबर २०२१मध्ये या तरुणीची एमएससी क्रुझ, कॅनडा’ येथे रिसेप्शनिस्ट म्हणून निवड झाल्याचे सांगून तिच्याकडून मेडिकलसाठी २६ हजार रुपये मागून घेतले. ही रक्कम न तरुणीने ‘गूगल पे’च्या माध्यमातून दिल्यानंतर भामट्या अभिजित याने कागदपत्रांसाठी, विमान तिकिटासाठी, सी. पी. ऑफिसमधील अधिकाऱ्यांना देण्यासाठी अशी वेगवेगळी कारणे सांगून तरुणीकडून आणखी पावणे दोन लाख रुपये उकळले.

त्यानंतर त्याने ११ नोव्हेंबर २०२१ रोजी अमेरिकेचे विमान असल्याचे सांगून स्वतःचा फोन बंद करून टाकला. त्यानंतर या तरुणीने – अमेरिकेत जाण्याची तयारी करून भामट्या अभिजितच्या मोबाइलवर अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आल्यानंतर या तरुणीने तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.