सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
विद्या प्रसारणी सभा चौक संचलित प्राथमिक विद्यामंदिर व शिशू मंदिर शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमास संस्थेच्या कार्याध्यक्षा व प्राथमिक विद्यामंदिरच्या अध्यक्षा शोभाताई देशमुख, संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र भाई शहा, प्राथमिक विद्यामंदिर व शिशूमंदिराचे समन्वय देवानंद कांबळे सर, संस्थेच्या संचालिका व प्राथमिक विद्यामंदिर चौकच्या मुख्याध्यापिका सुलभा मॅडम उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा तसेच प्राथमिक विद्यामंदिर व शिशुमंदिराच्या अध्यक्षा शोभाताई देशमुख यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र शहा यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवानंद कांबळे सर यांनी केले. लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याविषयी माहिती अतिशय सोप्या पद्धतीने मुलांना प्रिती मॅडम यांनी सांगितली.
इयत्ता पहिलीच्या काव्या गडगे हिने लोकमान्य टिळकांविषयी अतिशय सुरेख पद्धतीने भाषण केले. इयत्ता तिसरीची प्रचिती देशमुख हिने अण्णाभाऊ साठे यांविषयी छान भाषण केले.तसेच संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्रभाई शहा यांनी आपल्या भाषणामध्ये कार्यक्रमाच्या माध्यमातून थोर विभूतींच्या विचारांची व कार्याची मुलांना माहिती होते असते हे सांगितले तसेच लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

तसेच संस्थेच्या कार्याध्यक्षा, प्राथमिक विद्यामंदिर व शिशुमंदिराच्या अध्यक्षा व कार्यक्रमाच्या अध्यक्षा शोभाताई देशमुख यांनी मुलांना छान अशा पद्धतीने गोष्टी रूपातून लोकमान्य टिळकांची माहिती सांगितली ,तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे एका दलित परिवारात जन्माला आले होते त्यांनी त्याकाळात आपल्या लेखणीमधून व पोहोड्याच्या माध्यमातून जनतेचे प्रबोधन केले.तसेच आत्ताच्या काळामध्ये देश प्रेमाबद्दल मुलांनी कसे वागले पाहिजे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वसंत सरांनी अतिशय छान पध्दतीने केले.तसेच कार्यक्रमाचे सांगता चेतन सर यांनी आपल्या खास शैलीतून आभार प्रदर्शन केले.








Be First to Comment