सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष व देवळोली ग्रामपंचायतींचे सदस्य देवेंद्र (देवा) पाटील यांचे सुपुत्र कु.गंधर्व देवेंद्र पाटील याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवळोली गावातील सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी मोहोपाडा-रसायनी येथील पिल्ले महाविद्यालयातील शिक्षक व एन एस एस.विद्यार्थी यांच्या सहकार्याने देवळोली गावात वृक्ष लागवड कार्यक्रम व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.याप्रसंगी देवळोली गावातील सार्वजनिक ठिकाणी विविध जातींच्या वृक्षांची लागवड कु.गंधर्व यांच्या हस्ते करण्यात आली.तसेच परीसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.








Be First to Comment