खालापूर तालुक्यातील बहाद्दरांच्या कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला
सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
मल्हारपेठ पंढरपूर मार्गावर चितळी हद्दीतील लमाणवस्तीजवळ घरगुती एचपी कंपनीचा २५ टन गॅस भरलेला टँकर टायर फुटल्याने पलटी होण्याची घटना शनिवारी रात्री घडली .
याबाबत टँकर मालकांनी मायणी पोलिसांना माहिती कळविल्यानंतर सामाजिक संस्था रायगड, अग्निशमन दल, महावितरणच्या मदतीने टँकर सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. अपघात होऊनही गॅस टँकरला गळती न झाल्याने मोठी दुर्घटना टळली.यासाठी रसायनीतील अग्निशमन दलाचे तज्ञ धनंजय गीध,विजय भोसले, हनिफ कर्जिंकर यांना पाचारण करण्यात आले होते.त्यांनी अतिशय चाणाक्ष पध्दतीने गॅस टॅकर हाताळून अनर्थ टाळला.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, अपघात होऊनही गॅस टँकरला गळती झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
पलटी झालेल्या टँकरमध्ये टँकरचा टायर फुटल्याने सदर घटना झाल्याची माहिती टँकर मालकाने मायणी पोलिसांनी दिल्यानंतर घटनास्थळी मायणीच्या सहायक पोलिस निरीक्षक शीतल पालेकर सहकाऱ्यांसोबत दाखल झाल्या. त्यानंतर घटनास्थळी
कऱ्हाडहून तीन क्रेन, रायगडहून अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, अग्निशामक दल, महावितरण कंपनीचे कर्मचारी हजर झाले. त्यानंतर सर्वांच्या मदतीने अपघातग्रस्त टँकर सुरक्षित झाल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. या घटनेत टँकरमध्ये २५ टन गॅस होता.
टँकरला गळती झाली असती तर त्याचा परिणाम घटनास्थळापासून किमान १० किलोमीटरवर परिघापर्यंत झाला असता. मात्र पोलिस, अग्निशामक दलाचे तज्ज्ञ धनंजय गीध, विजय भोसले,हनीफ कर्जिंकर, महावितरणच्या मदतीने टँकरला बाहेर काढण्यात यश आले.यावेळी कामगिरीचा ताण ओसरल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.
Be First to Comment