Press "Enter" to skip to content

पनवेल शहर पोलिसांनी केली अवघ्या २४ तासात सुटका

१५ लाखांची खंडणी दे अन्यथा ठार मारु अशी धमकी देऊन केले अपहरण

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆

१५ लाखांची खंडणी दे अन्यथा तुला ठार मारु अशी धमकी देऊन अपहरण केलेल्या इसमाची पनवेल शहर पोलिसांनी केली अवघ्या २४ तासात सुटका केली आहे.

उपासना कमलकिशोर खबानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कमलकिशोर खबानी व रिझवान नावाचे इसमाचे व्यवसायिक वाद होते. त्या वादातून रिझवान याने त्यांचे पतीचे अपहरण केले असुन तो त्याचे सुटकेसाठी १५ लाख रुपये मागत आहे आणि नाही दिले तर फिर्यादीचे पती यांना ठार मारेन अशी धमकी देत असल्याचे पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना सांगितले. सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तात्काळ तपास पथके स्थापन करण्यात आली. तसेच गुन्ह्यातील आरोपीबाबत माहिती मिळवून तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार त्याचा शोध घेण्यासाठी भिवंडी परिसरात पोलिस पथक रवाना करण्यात आली.

Coming soon …

नमुद पोलिस पथकाने सलग २४ तास आरोपीचा भिवंडी, भिवंडी तालुका, कल्याण, नेरळ या भागात शोध घेतला. नमुद आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा नेरळ, कर्जत, जि.रायगड येथे असल्याबाबत माहिती मिळाल्याने तात्काळ त्याठिकाणी जावून अपहरण झालेल्या कमलकिशोर खबानी याची आरोपी रिझवान अहमद अब्दुल गफुर शेख व इतर तीन आरोपी यांचे ताब्यातून सुखरूप सुटका केली व सदरचा गुन्हा हा २४ तासाचे आत उघडकीस आणला.

गुन्ह्यातील अटक आरोपींची नावे रिझवान अहमद अब्दुल गफुर् शेख वय ३५ वर्षे रा. भिवंडी, ठाणे, सैजाद मोहमद अन्सारी, वय ३४ वर्षे रा. भिवंडी, ठाणे, वासिम अन्वर खान, वय ३७ वर्षे, रा. भिवंडी, ठाणे, इस्लाम उस्मान युसुफ शेख, वय ३४ वर्षे रा. भिवंडी, ठाणे तसेच गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार हस्तगत करण्यात आली आहे.

सदरचा गुन्हा हा बी. के.सिंह,पोलिस आयुक्त नवी मुंबई, डॉ.जय जाधव, सह पोलिस आयुक्त, नवी मुंबई शिवराज पाटील, पोलिस उपायुक्त , परिमंडळ ०२, नवी मुंबई, भागवत सोनवणे, सहा. पोलिस आयुक्त, पनवेल विभाग, नवी मुंबई यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार व सूचनांनुसार उघडकीस आण्यात आला. यासाठी गुन्ह्याचे तपास पथक वरीष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने, पनवेल शहर पोलिस ठाणे, पोलिस निरिक्षक, गुन्हे संजय जोशी, सहा पोलिस निरीक्षक गणेश दळवी, पो. हवा. गंथडे, पो. हवा.वाघमारे, पो.ना. राठोड, पो.शि. मिसाळ आदींनी मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.