चक्क आई, वडिलांवर हवेत गोळीबार करून दिली धमकी ; मुलगा गजाआड
सिटी बेल ∆ उरण ∆ वार्ताहर ∆
साडेबारा टक्के पैशाच्या व घराच्या वादातून स्वतः च्या जन्मदात्या आई, वडिलांवर हवेत गोळीबार करण्याची घटना न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटली आहे.यासंदर्भात आरोपी विक्रांत भोईर यांच्या विरोधात खुद्द आईवडीलांनी न्हावा- शेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार न्हावा ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असणाऱ्या विक्रांत भोईर यांनी आपली आई वासंती भोईर ( वय ४६) व वडील जयवंत भोईर यांच्या कडे साडेबारा टक्के पैशाची व घरासाठी खर्च केलेल्या पैशांची मागणी केली होती.या झालेल्या वादातून विक्रांत भोईर यांनी स्वतःच्या आई वडिलांना धमकावण्यासाठी गुरुवार दि२२ जुलै रोजी सकाळी पहाटे ६-३० च्या सुमारास हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

आरोपी विक्रांत भोईर याच्या विरोधात आईवडिलांना धमकावल्या प्रकरणी व हवेत केलेल्या गोळीबारा प्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात फिर्यादी जयवंत भोईर यांनी तक्रार दाखल केली आहे.न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भेट यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी विक्रांत भोईर यांस अटक करण्यास पोलीसांना यश आले असून न्यायालयाने आरोपीस दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे.








Be First to Comment