पंढरपुरात वैश्य समाजाच्या वतीने धर्मशाळेचे भूमिपूजन संपन्न
सिटी बेल ∆ पंढरपूर ∆
आषाढी एकादशी निमित्त जमलेली वैष्णवांची मांदियाळी विठुरायाचे दर्शन घेऊन आपापल्या घराच्या वाटेला लागली असतानाच वैश्य समाजाच्या वतीने पंढरपुरात धर्मशाळेच्या भूमिपूजनाचा सोहळा आयोजित करण्यात. विशेष म्हणजे वैश्य समाजाच्या वतीने या ठिकाणी दोन धर्मशाळा बांधण्यात येणार आहेत.
पंढरपूर येथे झालेल्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आळंदी येथील वैश्य समाजाच्या धर्मशाळेचे अध्यक्ष सन्मा. सोनटक्के महाराज तसेच त्यांचे सहकारी, ठाणे जिल्हा वैश्य समाज अध्यक्ष विजय निक्ते आदी मान्यवरांची उपस्थिती होती. समाजातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे ठाणे येथील राजाभाऊ पातकर यांनी एक वर्षात या दोन धर्मशाळांची इमारत बांधणी पूर्ण होईल असा विश्वास प्रकट केला.
ते पुढे म्हणाले की, मुख्य मंदिरापासून अवघ्या दोन किलोमीटरच्या परिसरात आपल्या समाजाच्या दोन भव्य दिव्य धर्मशाळा उभारल्या जात आहेत याचा निश्चितच अभिमान वाटतो. साधारणपणे तीन स्क्वेअर फुट आकारमानाचे दोन हॉल, 45 रूम्स, उद्यान,पडवी, न्हाणीघरे, पार्किंग साठी सुसज्ज जागा अशा स्वरूपाच्या दोन धर्मशाळा असणार आहेत.
भूमिपूजन कार्यक्रमाचे वेळेस कार्यक्रमास माजी अध्यक्ष पातकर साहेब,कैलास पोटे .सौ अश्विनी ताई व त्यांच्या महीला सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर उपक्रमास समाज बांधवांनी यथाशक्ती हातभार लावावा असे कळकळीचे आवाहन आयोजकांच्या वतीने यावेळी करण्यात आले.
Be First to Comment