सिटी बेल ∆ पनवेल ∆
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काल ग्रामपंचायत पारगाव येथील पारगाव डुंगी व पारगाव गावातील पुरपरिस्थिती पाहणी केली.
त्यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच सौ.अहिल्याताई बाळाराम नाईक यांनी सांगितले की, पारगाव व पारगाव डुंगी येथे गेल्या पाच वर्षापासून विमानतळाच्या दगड मातीच्या भरावामुळे पावसाचे पाणी आडून अशी पूर परिस्थिती पावसाळ्यात चार ते पाच वेळा निर्माण होत असते. सिडको कडे पारगाव व पारगाव डुंगी गाव पुनर्वसन करणे बाबत व पुरग्रस्त शिल्लक राहिलेल्या ग्रामस्थांना लाभ देणे बाबत वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा सिडको याकडे लक्ष देत नाही. तरी आपण याकडे लक्ष द्यावे अशी विनंती त्यांनी यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्याधीकाऱ्यांकडे केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी म्हणणं ऐकून घेतल्यानंतर असे सांगितले की, “ग्रामस्थांच्या मागणीबाबत सिडको कडे व प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल तसेच सिडकोकडे योग्य ती मागणी बाबत चर्चा करण्यासाठी मीटिंग साठी वेळ मागण्यात येईल जास्तीत जास्त प्रयत्न करीन.”
यावेळी पनवेल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अविनाश घरत व विश्वास म्हात्रे, ग्रामपंचायत पारगावच्या उपसरपंच सौ. निशाताई पाटील, सदस्य सुशीलकांत तारेकर, विश्वनाथ पाटील सामाजिक कार्यकर्ते, बाळाराम नाईक, रत्नदीप पाटील, श्रीधर पाटील, ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोरेश्वर मोकल तसेच सचिन जगताप ग्रामसेवक दापोली व नारायण केणी ग्राम विकास अधिकारी पालीदेवद उपस्थित होते.







Be First to Comment